औरंगाबाद

आंतरजिल्हा बदली संदर्भात दिवाळीनंतर मंञालयात बैठक

ग्रामविकास मंञी ना.हसन मुश्रिफ यांचे शिक्षक समितीच्या शिष्ठमंडळाला आश्वासन

खुलताबाद / प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांना करण्यात आली. या अनुषंगाने शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन याप्रसंगी ना हसन मुश्रिफ यांनी आंतरजिल्हा बदली संदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहीती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्वजिल्ह्यात आंतरजिल्हा बदली करण्याच्या संबंधाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय घेऊन शासनादेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीचे चार टप्ये पूर्ण झाले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर जिल्ह्यात जाणार्‍या शिक्षकांच्या बदली संदर्भात अनेक अडचणी असल्याने अद्याप काही शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही असे निवेदनात नमुद आहे. तसेच कमी पटसंख्येच्या शाळेतील रिक्त पदांवर शिक्षक पदस्थापना न करण्याचे निर्देश असल्याने या जागा रिक्त आहेत त्या त्वरीत भरण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिक्षक भरती पोर्टलवर पदवीधर रिक्तपदे मराठी माध्यमासाठी २८७, उर्दू माध्यमासाठी १४ अशी ३०१ पदे रिक्त दाखविण्यात आली.आहे. प्रत्यक्षात ७८ उमेदवार रुजू झाले आहेत. २०९ पदे अजुनही रिक्त आहेत. ही पदे नियमित विज्ञान शाखेतून डीएड शिक्षकांमधून विकल्प भरून पदोन्नतीने भरण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच सहाय्यक पदे शिक्षक भरतीत विशेष टप्पा राबवून भरण्यात यावी त्यामुळे दहा टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाही आणि आंतरजिल्हा बदलीसाठी येणारी अडचण दूर होईल असेही निवेदनात नमूद आहे. आंतरजिल्हा टप्पा क्र.१मध्ये ३५शिक्षक २०१७ पासून कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. तर रप्या क्र. ३ व ४ मधील १०३ शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहे असेही निवेदनात नमूद आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दोन ते तीन जिल्हे निवडून साखळी पद्धतीने बदल करण्यात यावे अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रश्नावर ना हसन मुश्रिफ यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच शालेय वीजबिल व मुख्यालयाचा प्रश्नही मांडण्यात आला. या सर्व समस्यांवर दिवाळीनंतर मंत्रालयात बैठक तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, जिल्हा विभागीय उपाध्यक्ष घेऊन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन ना हसन मुश्रिफ यांनी दिले. यावेळी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, प्रसिद्धीप्रमुख हरिदास वणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, दादासो हुंबरे. ज्ञानेश्वर परदेशी, कागल सदानंद यादव उपस्थित होते.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले असल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, के.के.जंगले, अंकूश वाहूळ,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी, कडूबा साळवे,बबन चव्हाण, विलास चव्हाण यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close