औरंगाबाद

भाजपच्या वतीने औरंगाबाद मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी शिरीष बोराळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपा राष्ट्रीय स्तरावरुन उमेदवारांची घोषणा ; प्रवीण घुगे यांना निवडणुकीतुन वगळले

औरंगाबाद / प्रतिनिधी

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी भाजपाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा राष्ट्रीय स्तरावरुन केली आहे. अनेक इच्छुक असताना 2014 प्रमाणे पुन्हा उमेदवारी मिळवण्यात बोराळकरांनी बाजी मारली आहे. बोराळकर यांना उमेदवारी पुन्हा मिळाल्यानंतर कही खुशी कही गम असल्याचे वातावरण आहे. बहुजनांवर अन्याय भाजपात होत असल्याची पोस्ट सोशलमिडीयावर फिरत आहे. इच्छुकांची समजूत काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आलेले आहे. किशोर शितोळे, प्रविण घुगे, जयसिंगराव गायकवाड यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बोराळकर यांच्या नावाची घोषणा प्रसिध्दीपत्रक काढत राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील उमेदवारांचे नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ शिरीष बोराळकर, पूणे पदवीधर संग्राम देशमुख, नागपूर संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदान संघातून नितीन रामदास धांडे यांची नावे जाहीर झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close