औरंगाबाद

खुलताबाद येथील दर्गा ज़रज़री ज़रबक्ष(रह) व दर्गा शाह राजू क़त्ताल (रह) रस्त्याची दयनीय अवस्था

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन सादर

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद येथील सुप्रसिद्ध दर्गा हज़रत ज़रज़री ज़रबक्ष(रह) तसेच दर्गा शाह राजू क़त्ताल(रह) कडे जाणारा मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असुन या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी अशी मागणी खुलताबाद काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख इकरामोद्दीन यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाखड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रासाला समोर जावे लागत आहे.विशेष म्हणजे दर्गा ज़रज़री ज़रबक्ष येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते.मात्र रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्थामुळे भाविकांना पायपीट करावी लागत आहे.तसेच शासकीय विश्रामगृह असुन येथे नेहमी शासकीय अधिकारी तसेच व्यक्ति विशेष येत असतात.तसेच बांधकाम विभाग ऑफिसकडे जाण्यासाठी हेच रस्ता असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून सदर रस्त्याची दर्जेदार कामे लवकरात लवकर पूर्ण करावे.या निवेदनावर शहर काँग्रेस कमिटीचे अब्दुल समद टेलर,माजी नगराध्यक्ष सलीम युसूफ कुरैशी,शहर उपाध्यक्ष शेख इकरामोद्दीन,दर्गा कमिटीचे सदस्य रईस जागीरदार यांच्या सह्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close