औरंगाबाद

मासिआ युएनडीपी हेल्प डेस्क अंतर्गत ‘ स्ट्रेस मॅनेजमेंट’ विषयी  वेबिनार

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

०७ नोव्हेंबर २०२० रोजी मसिआच्या वाळूज येथील कार्यालयात UNDP च्या सहकार्याने ‘मसीआ-कोविड-१९ मदत कक्ष’ अंतर्गत “ Stress Management” या विषयावर वेबीनार आयोजित करण्यात आला होता. सलिल पेंडसे, व्यवस्थापन सल्लागार व प्रशिक्षक यांनी या माध्यमातून  “Stress Management” या विषयावर वेबीनार द्वारे संबोधन केले. सध्या कोविड १९ च्या प्रभावामुळे उद्योजक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या सर्व गोष्टींचा ‘ताण’ आज प्रत्येक क्षेत्रातील लोकांना आहे. उद्योजक, कर्मचारी, कामगार आणि इतर सर्व . या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचा ताण (Stress) आलेला आहे. परंतु या ताणाला दूर ठेवता आले तरच आपण आपले उद्दिष्ट गाठू शकतो. यामुळे MASSIA-UNDP हेल्प डेस्क अंतर्गत “Stress Management” हा विषय वेबीनारच्या माध्यमातून उद्योजकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सलिल पेंडसे यांनी यावेळी अतिशय खुमासदार शैलीत ‘ताण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ताणाचे सकारात्मक ताण व नकारात्मक ताण असे दोन प्रकार असल्याचे सांगून , अत्यंत सोप्या पद्धतीने ताणाचे व्यवस्थापन कसे करायला हवे हे सांगितले. ताण हा जीवनाचा अविभाज्य घटक असून तो त्यांनाच येतो जे कार्यशील असतात.  तसेच ताण ही एक सहज मानसिक व शारीरिक प्रक्रिया असून त्यासाठी ‘4 A’s’ चा मंत्र सांगितला.  यामध्ये कोणत्या गोष्टी आपण टाळू शकतो तसेच या सर्वांचा आपल्या कार्यशैलीवर कसा परिणाम होतो हे देखील स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांनी आलेल्या ताणाला न घाबरता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलावा आणि आपल्या समस्या सोडवाव्या असे पेंडसे यांनी सांगितले. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानही पेंडसे यांनी केले. या वेबीनार साठी 42 सदस्यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. या हेल्प डेस्क चे समन्वयक गजानन देशमुख यांनी प्रस्तावना केली. आभार प्रदर्शन आरती गावडे यांनी केले. या वेबीनार साठी मसीआ चे उपाध्यक्ष नारायण पवार, किरण जगताप, सचिव भगवान राउत व राहुल मोगले, कोषाध्यक्ष विकास पाटील, प्रसिद्धी प्रमुख सचिन गायके, व पदाधिकारी सर्व अर्जुन गायकवाड, मनीष अग्रवाल, संदीप जोशी, कुंदन रेड्डी, अभिषेक मोदाणी यांच्यासह एकूण 40 जणांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला. असे प्रसिद्धी प्रमुख सचिन गायके व सह प्रसिद्धी प्रमुख सुमित मालाणी हे काळवितात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close