औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार; खुलताबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

तालुक्यातील वेरूळजवळील शार्दुलवाडी येथील घटना

खुलताबाद / प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीर संबंध ठेवून एका तरूणीवर  अत्याचार झाल्याची घटना वेरूळजवळील शार्दुलवाडी येथे घडली असून तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एका तरूणावर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे. या विषयी खुलताबाद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खुलताबाद तालूक्यातील शादुलवाडी येथील आरोपी योगेश शिवराम पवार वय 20 वर्षे या तरूणाने 2016 साली एके दिवशी आपल्या बहिणीच्या घरी एका 19 वर्षाच्या तरूणीला बोलवून बळजबरीने अत्याचार केला होता सदरिल तरूणी रडू लागली म्हणून योगेशने तरूणीला समज देत मी तुझ्या सोबत लग्न करील तु घडलेली घटना कोणाला सांगू नको तु जर हि माहिती इतरांना सांगितली तर तुझी समाजात बदनामी होईल मी तुझ्या सोबत लग्न करेल असे  तरूणीला सांगितले त्यामुळे तरूणीने घरच्यांना घडलेली घटना सांगितली नाही 2016 साली पासुन ते 2029 पर्यंत योगेश पवारने लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वेळोवेळी अत्याचार करत राहिला दिनांक 8 एप्रिल 2020 रोजी योगेशचा वाढदिवस होता योगेशने  त्याच्या  शेतात तरूणीला केक कापण्यासाठी बोलवून घेतले तरूणी योगेशच्या शेतात गेली त्या ठिकाणी योगेश तरूणीला म्हणाला की माझे घरचे तुझ्या सोबत लग्न करण्यासाठी नाकारत आहे म्हणून मी तुझ्या सोबत लग्न करू शकत नाही माझे घरचे नाही म्हणतात म्हणून आपन कोर्ट मॅरेज करू असे म्हणून अचानक तरूणीचा हात पकडून बाजरीच्या शेतात ओढून घेवून गेला व तरूणी सोबत बळजबरी करू लागला तरूणीने विरोधी केला असता तीला धमकावत तीचे तोंड दाबून तीच्या इच्छेविरुद्ध शरीर सबंध केले. त्या नंतर 24 अक्टोंबर 2020 रोजी योगेशने तरूणीला पुन्हा त्याच्या शेतात बोलवून घेतले होते त्या ठिकाणी तरूणीने योगेशला तु माझ्याशी लग्न कधी करणार यावर योगेशने घरचे विरोध करीत आहे तुझ्याशी कोर्ट मॅरेज करेल असे बोलून योगेशने तरूणीचे हात धरून तुरीच्या शेतात घेवून गेला व बळजबरी करू लागला तरूणीने त्याला पहिले लग्न कर त्यावर योगेशने तीच्या सोबत बळजबरी केली व शरीर सबंध केले योगेश गेल्या चार वर्षापासून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करत राहिला  योगेश लग्न करत नसल्याचे पाहून तरूणीने घडलेली घटना घरच्या लोकांना सांगीतली तरूणीच्या नातेवाईकांनी तरूणीला सोबत घेऊन खुलताबाद पोलीस ठाणे गाठले नातेवाईकांनी योगेश पवारने तरूणी सोबत केलेल्या अत्याचाराची माहिती दिली तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून योगेश पवार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून योगेशला अटक करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे हे करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close