औरंगाबाद

गंगापूर पोलीस ठाण्यात पडून असलेल्या बेवार ४४ दुचाकीचा लिलाव

गंगापूर/प्रतिनिधी

विविध भागात बेवारस अवस्थेत सापडलेल्या ४४ मोटारसायकलचा लिलाव तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्या समक्ष पार पडला असुन ३ लाख ६५ हजार रुपयांत लिलाव झाला. येथील पोलिस ठाण्यात अनेक वर्षांपासून विविध गुन्हा्यातील भंगार वाहने धूळ खात पडून होती या बेवारस दुचाकी भंगार वाहनांचा शनिवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार अविनाश शिंगटे, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोहेका लक्ष्मण पुरी, रवी लोदवाल, गणेश खंडागळे, रिजवान शेख मंडळ अधिकारी संदीप वाडीकर कोतवाल बाबु शेख आदींच्या समक्ष लिलाव करण्यात आला. या लिलावात विस जणांनी सहभाग नोंदवला होता या ४४ गाड्यांची लिलावाची सरकारी बोली १ लाख ४८ हजार १५० रुपये होती हा लिलाव गंगापूर शहरातील भंगार व्यावसायिकाने तिन लाख 65 हजार बोली लावून घेतल्या आहे. या सर्व वाहनांवर बुलडोझर फिरवून देण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close