बुलडाणा

जनतेच्या कोरोना चाचण्या करण्यासाठि नगरपरिषद सुध्दा सरसावली

लोणार/संदीप मापारी पाटील
कोरोनाचि दुसरी लाट थोपवण्यासाठि कोरोना चाचण्या वाढवाव्यात असे प्रयत्न प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे, ह्यांच्या मार्गदर्शनात सदर चाचण्या जिल्हाभरात करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने लोणार नगरपरिषदेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारयांकडे होणारी गर्दी बघता शहरातील सर्व भाजीविक्रेते , किराणा व्यापारी , मांस विक्रेते, केशकर्तनालय चालक , कपडा, ज्वेलरी तथा शहरातील इतर सर्व व्यापारी यांची कोरोना चाचणि करण्यासाठी चाचणी सप्ताहाचे आयोजन स्थानिक नगर परिषद वाचनालयात आयोजित केला आहे. या सप्ताहाला नगरपरिषद अध्यक्ष पति मनिष पाटोळे व नगरपरिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी स्वतः चि कोरोना चाचणी करून घेउन सुरुवात केली, तहसीलदार सैफन नदाफ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ शहा ,मुख्याधिकारी विठ्ठल केदारे याच्या अभिनव संकल्पनेतुन लोणार कोविड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ भास्कर मापारी यांनी शहरातील प्रत्येक व्यापारी व नागरीकाचि मोफत कोरोना चाचणी करण्यासाठी फिरते पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून सदर चाचण्या पुढील ७ दिवस करण्यात येणार असल्याचे सूतोवाच डॉ किसन राठोड यांनी केले, या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला आज सुरवात करण्यात आली असून सर्व व्यापारी बांधव तसेच ज्या व्यक्तीला वाटत असेल कि आपली कोरोना चाचणी करावयाचि त्या प्रत्येक व्यक्तीचि चाचणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करनार असल्याचे मुख्याधिकारी केदारे यांनी या प्रसंगी सांगितले, या कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी केदारे वैद्यकीय अधिक्षक डॉ शहा , मनिष पाटोळे, कोविड सेंटरचे व्यवस्थापकिय संचालक डॉ भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम माल, डॉ निखिल अग्रवाल, डॉ पुजा सरकटे घायाळ, लॅब टेक्नीशियन नरसिंग जायभाये, पवन चेके , परिचारिका अश्विनी डोंगरदिवे यांच्या सह शहरातील व्यापारी उपस्थित होते .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close