औरंगाबाद

राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्यांबाबतच्या शासन परिपत्रकात सुधारणा करून नव्याने परिपत्रक निर्गत करून संभ्रम दूर करा

प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन

खुलताबाद / प्रतिनिधी

राज्यातील शाळांना यावर्षी दिवाळीच्या सुट्या दि. १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घोषित करण्याचे संदर्भित शासन परिपत्रक निर्गत झाले आहे. सदर परिपत्रकाने राज्यात संभ्रम निर्माण झालेला आहे.हा संभ्रम दुर करुन नविन परीपञक निर्गमित करण्याची मागणीचे निवेदन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी शिक्षणमंञी वर्षा गायकवाड,अति.मुख्य सचिव डाॅ.वंदना कृष्णा, राज्य शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना ई-मेल व्दारे पाठविले आहे.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (प्रकरण-४, कलम- १९ व २५ : अनुसूची) प्राथमिक शाळांतील कामाचे दिवस २०० आणि वरिष्ठ प्राथमिक शाळांसाठी २२० आहेत. माध्यमिक शाळा संहितेनुसार एकूण सुट्या ७६ पेक्षा दिवस अनुज्ञेय नाहीत. याच निकषास अनुसरून प्राथमिक शाळांना ७६ दिवस सुट्ट्या (ज्यात सार्वजनिकासरकारी सुट्ट्या, स्थानिक सुट्ट्या आणि ग्रीष्मकालीन व दिवाळी सुट्ट्यांचा अंतर्भाव आहे. वर्षातील ५२ रविवार धरून एकूण सुट्या १३७ होतात. RTE (प्रकरण-४. कलम – १९ व २५ : अनुसूची) व त्यानुषंगाने निर्गत शासन निर्णय : पीआरई-२०१०/प्र.क्र. ११४/प्राशि-१ दि. २९ एप्रिल २०११ नुसार प्राथमिक साठी २०० व उच्च प्राथमिकसाठी २२० दिवस असतानाही २२० पेक्षा अधिक शालेय कामकाज दरवर्षी होते. शाळांना ग्रीष्मकालीन दीर्घ सुट्या आणि दिवाळीच्या दीर्घ सुट्या असल्यानेच शिक्षकांना शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांप्रमाणे ३० दिवसाच्या अर्जित रजा अनुज्ञेय नाहीत. तर वर्षाच्या केवळ १० अर्जित रजा मान्य आहेत.तसेच शिक्षक दीर्घ सुट्टी भोगणारे कर्मचारी असल्याने त्यांना ग्रीष्मकालीन दीर्घ सुट्टी कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही. शिक्षकेत्तर कर्मचारी/अधिकाऱ्यांना १२ महिन्याचा वाहतूक भत्ता मिळत असताना- शिक्षकांना १० महिने कालावधीचाच वाहतूक भत्ता दिला जातो.शिक्षक दीर्घ सुट्टी घेत असल्याचे सांगत शिक्षकांना शासनाने रजा रोखीकरणाच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगर परिषद) शाळा, अनुदानीत खाजगी प्राथमिक शाळांच्या शालेय कामकाजाच्या आणि सुट्ट्यांचे निर्धारण शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षक संघटनांसह बैठक घेऊन आणि त्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीची मान्यता घेऊन निश्चित करतात. तर माध्यमिक शाळाच्या संबंधाने शिक्षणाधिकारी आवश्यक नियोजन करून कामकाज व सुट्यांची निश्चिती करतात.कोरोना साथरोग संक्रमण सुरु होण्यापूर्वी राज्यात सर्वत्र प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी (२०२०-२१) कामकाजाचे निर्धारण झाले आहे. त्यानुसार राज्यात स्थानिक जिल्हास्तरावर दिवाळी, ग्रीष्मकालीन आणि स्थानिक सुट्या निश्चित झाल्या आहेत. जिल्हास्तरावर प्रचलित पद्धतीनुसार केलेल्या नियोजनानुसार दिवाळीच्या सुट्ट्या घेतल्यास शालेय कामकाजाच्या दिवसावर कोणताच प्रतिकूल परिणाम होत नाही. शासन शिक्षण हक्क कायद्यात नमूद शालेय कामकाज दिवस कुठेही कमी होत नाही.मात्र शासन परिपत्रकानुसार १२ ते १६ नोव्हेंबर २०२० अशा सुट्ट्या घोषित झाल्याने प्राथमिक शाळांना मिळणाऱ्या सुट्या कमी होणार आहे. RTE नुसार आवश्यक कामकाजाचे दिवस पूर्ण करणारे नियोजन करून जिल्हा स्तरावर आधीच कामकाज निर्धारण झाल्याने ५ नोव्हेंबर २०२०च्या परिपत्रकाची कोणतीही आवश्यकता नसल्याची व सदर परिपत्रकामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची ठाम धारणा आहे.त्यामुळे १२ ते १६ नोव्हेंबर २०२० दिवाळीची सुट्टी अशाप्रकारचे परिपत्रक रद्द करून प्रचलित पद्धतीनुसार जिल्हा स्तरावर झालेल्या नियोजनानुसार दिवाळीच्या सुट्ट्या असण्याबाबतचे सुधारित परिपत्रक तात्काळ निर्गत करून ५ नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे,राज्य नेते काळु बोरसे, शिक्षक नेते शिवाजी साखरे,उपाध्यक्ष राजन कोरगांवकर, कार्याध्यक्ष राजेन्द्र नवले, कोषाध्यक्ष केदु देशमाने, संघटक सयाजी पाटील, चिटणीस शिवाजी दुर्शिंग,संपर्क प्रमुख राजेन्द्र खेडकर,प्रवक्ता आबा शिंपी,राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,आॅडीटर राजेन्द्र पाटिल,न.पा.मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, महीला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे,सचिव नलिनी सोनूने सह औरंगाबाद शिक्षक समितीचे विजय साळकर, रंजित राठोड,सतीश कोळी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close