नाशिक

जयहिंद महिला मंच कडून दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ भेट,दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार

संगमनेरातून अभिनव उपक्रम

संगमनेर/अमोल भागवत

प्रगतशील असलेल्या संगमनेर तालुक्याने कायम रायाला दिशादर्शक काम केले आहे. यावर्षी आपले घरदार सोडून देशवासीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय सैनिकांना जयहिंद महिला मंच,स्वराय सैनिक कल्याण संस्था यांच्या वतीने आजी – माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी दिवाळीचे फराळ भेट देण्यात येणार असून या नागरिकांना जवानांना मिठाई भेट देवयाची आहे त्यांनी उच्च प्रतिची पॅकिंग स्वरुपातील मिठाई यशोधन कार्यालयात जमा करावी असे आवाहन जयहिंदच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देत स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यात सहकाराचे मोठे जाळे निर्माण केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण,व्यापार आदि क्षेत्रात रायात अग्रगण्य ठरला आहे. पुरोगामी व समतेचा विचार जोपासत अनेक उपक्रम संगमनेरमध्ये सातत्याने राबवले जात आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, वैभवशाली शहर ठरलेल्या संगमनेर तालुक्यात दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून मागील पाच वर्षांपासून  दिवाळी निमित्त जयहिंद महिला मंच, राजमाता जिजाऊ महिला मंडळ,एकवीरा फाऊंडेशन, माऊली संस्था यांच्या वतीने भारतीय सैनिकांना फराळ देण्यात येत आहे.  भारतीय सैनिक हे कायम आपल्या परीवारापासुन हजारो किलोमीटर दूर असतात.सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात.रात्रंदिवस ऊन ,वारा,पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना या नागरिकांना सैनिकांना फराळ भेट द्यावयाची आहे त्यांनी रविवार दि.8 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11. वा.पर्यंत यशोधन कार्यालयात फराळ पॅकिंग पोहच करावी. ही मिठाई आजी – माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना यावेळी भेट दिली जाणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे,वीरमाता अलकाताई रहाणे, वीरमाता शारदा थोरात,वीरपत्नी सुनिता निघुते,मेजर वीरजवान मेजर संदिप उर्किडे आदिंसह तालुक्यातील सर्व आजी – माजी सैनिक उपस्थित राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close