औरंगाबाद

खुलताबाद पोलीस पाटील संघटनेच्या वतीने तहसीलदार निखील धुळधर यांचा सत्कार

खुलताबाद/प्रतिनिधी

खुलताबाद तहसील कार्यालयात नुकतेच रुजू होऊन पदभार घेतलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखील धुळधर यांचा खुलताबाद तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला , तदनंतर तहसीलदार यांनी पोलीस पाटलाचा परिचय करून घेतला व लवकरच पोलीस पाटलाचा बैठक घेऊ असे सांगितले. नुकतेच तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या जागी बदलून आलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखील धुळधर यांचा बुधवारी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष जनार्दन उबाळे, उपाध्यक्ष सिंधूताई बढे, सचिव रमेश धिवरे, संतोष सातदिवे, राजेंद्र बढे, रवींद्र शिंदे, तेजराव चव्हाण, भगवान वाहुळ यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.या वेळी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करताना प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखील धुळधर म्हणाले कि, पोलीस पाटील हा प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मधील दुवा असून गावात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या दृष्टीने गावातील विशेष घडामोडींची माहिती वेळोवेळी पोलीस पाटलांनी प्रशासनास कळवावी, लवकरच तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक आयोजित करून गावनिहाय आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या वेळी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे , उपाध्यक्षा सिंधूताई बढे, सचिव रमेश ढिवरे, संतोष सातदिवे, भगवान वाहुळ, रवींद्र शिंदे, तेजराव चव्हाण, अजीनाथ जाधव, वाल्मीक लग्गड, रायभान सोनवणे आदी पोलीस पाटलांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close