औरंगाबाद

औरंगाबादेत अर्णब गोस्वामीच्या समर्थनात भाजपा रस्त्यावर, आंदोलकांना क्रांतीचौकात घेतले ताब्यात

औरंगाबाद / प्रतिनिधी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब  गोस्वामी यांना बुधवार रोजी सकाळी त्यांच्या निवास्थानातून मुंबई पोलीसांनी अटक केली. याचा निषेध करण्यासाठी व अर्णबच्या समर्थनात भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. आंदोलनात कार्यकर्ते अक्रामक होत चौकात चक्कर मारत संतप्त होवून आघाडी सरकारच्या विरोधात ‘तिघाडी सरकार हाय हाय’ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला सहन करणार नाही अशी घोषणाबाजी केली. पत्रकारांना  दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार अतुल सावे यांनी सांगितले आघाडी सरकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करत आहे. 1977 साली जी आणीबाणी लावली होती अशा प्रकारे हि अटक करण्यात आली आहे याचा निषेध करतो. यावेळी बंदोबस्तात तैनात पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, दयाराम बसैय्ये, अनिल मकरिये, माधुरी अदवंत, अनिल मकरिये, प्रमोद राठोड, लता दलाल, कचरु घोडके, शिवाजी दांडगे, राज वानखेडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close