औरंगाबाद

जिल्हाधिकारी यांनी केली मालोजीराजे यांच्या गढीचे आणि शहाजी राजे यांच्या स्मारकाची पाहणी

खुलताबाद / प्रतिनिधी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज मालोजीराजे यांच्या गढीचे आणि शहाजीराजे यांच्या वेरूळ येथील आणि स्मारक स्थळाची पाहणी केली. यावेळी समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार निखिल धुळधर, गट विकास अधिकारी सुरडकर, पुरातत्व विभागाचे समन्वयक कामाजी डक, पुरातत्व उपआवेष्क बालाजी बनसोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मालोजी राजे यांच्या गढीचे जतन आणि शहाजी राजे स्मारकाची पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाला सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यावेळी पर्यटन स्थळाचा विकास करून लवकरात लवकर जनतेला इतिहासाचा ठेवा पाहण्यासाठी खुला करून द्यावा यासाठी वीज,पाणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्यास जास्तीत जास्त पर्यटक या गढी आणि स्मारकास भेट देतील यासाठी परिपूर्ण पर्यटन आराखडा तयार करण्याबाबतचे निवेदन वेरुळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close