औरंगाबाद

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी परसराम बारगळ यांची निवड

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद नगरपरिषदेचे नगरसेवक परसराम पाटील बारगळ यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असुन त्यांच्यावर तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खुलताबाद येथे शनिवार रोजी नगरपरिषद सभागृहात झालेल्या बैठकीत खासदार डॉ.भागवत कराड,आमदार प्रशांत बंब , भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते,जि.प उपाध्यक्ष एल.जी गायकवाड,प्रवीण घुगे,लक्ष्मण औटे,यांच्या प्रमुख उपस्तिथित परसराम बारगळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल आमदार प्रशांत बंब यांनी बारगळ यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच या निवडीबद्दल भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे,उपनगराध्यक्ष सुरेश मरकड ,जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर नलावडे,सभापती गणेश अधाने ,पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे,प्रकाश शिंदे , माजी उपसभापती दिनेश अंभोरे ,नगरसेवक योगेश बारगळ ,अविनाष कुलकर्णी ,प्रकाश चव्हाण,शिवाजीराव साळुंके, सरचिटणीस शिवाजी गायकवाड ,गणेश बोर्डे ,युवा तालुका उपाध्यक्ष निलेश गायकवाड आदिंनी बारगळ यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close