औरंगाबाद

देवळाना येथील माजी ग्राम पंचायत सदस्य जमीला बी यांचे निधन

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील देवळांना बुद्रुक येथील माजी ग्राम पंचायत सदस्य जमीला बी बुऱ्हाण खान पठाण वय (९०) वर्ष यांच्या शुक्रवारी दि २९ रोजी संध्याकाळी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या दफनविधी त्यांच्या इच्छेनुसार खुलताबाद शहरातील  “जन्नतुल बकीय ” कब्रस्तान येथे रात्री अकरा वाजता करण्यात आले त्यांच्या पश्चात सात मुले, दोन मुली ,नातवंडे, जवाई ,सुना असा परिवार होता  स्वर्गवासी:जमीला बी बुऱ्हाण खान पठाण हे सन १९९५ ते २००० या काल खंडात ग्रुप ग्राम पंचायत देवळांनाचे सदस्य  होते  आपल्या काळात त्यांनी अनेक समाजोपगी योजना ग्रामस्थांसाठी राबवल्या होत्या ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणुन प्रचलित होते माजी ग्राम पंचायत सदस्य मुसा पठाण तसेच सामाजिक कार्यकर्ते फईम पठाण व शमीम पठाण यांच्या ते आई होतं त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच देवळांना गावावर शोककळा पसरली होती सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close