नाशिक

पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ,धुमाळवाडी येथील बाळासाहेब देशमुख यांच्या बंगल्यात तिसऱ्यांदा चोरी

संगमनेर/अमोल भागवत

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील धुमाळवाडी येथील बाळासाहेब देशमुख यांचा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरट्यांनी विविध वस्तू चोरून पोबारा केल्याचा घटना मंगळवार दिनांक 27 रोजी पहाटे घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील डोळसणे गावांतर्गत असलेल्या धुमाळवाडी याठिकाणी बाळासाहेब देशमुख यांचा बंगला असून ते नोकरी निमित्त पुणे येथे राहत आहेत. मंगळवार पहाटे अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूने आत मध्ये प्रवेश केला. दरवाजाचे कुलूप तोडून त्यानंतर चोरांनी बंगल्याच्या आत मध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आत मधील सामानाची उचका पाचक केली. सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही डी. व्ही. आर साहित्य सेट ऑफ बॉक्स लोखंडी पान्हे आणि आदि साहित्याची चोरी केली. कॅमेर्‍यात दिसू नये म्हणून कॅमेर्‍याचे नुकसान केले. ही घटना बाळासाहेब देशमुख यांच्या आईच्या सकाळी लाईट बंद करण्यासाठी गेले असता लक्षात आली. त्यानंतर शेजारी राहणारे रावसाहेब भुजबळ यांना ही घटना त्यांनी सांगितली व भुजबळ यांनी बाळासाहेब देशमुख यांना फोन करून सविस्तर घटनेची माहिती दिली. या आगेदर देशमुख यांच्या बंगल्यावर दोन वेळा चोरी झाली होती.  चोरांनी देशमुख यांचा बंगला लक्ष केला की काय असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी बाळासाहेब देशमुख यांचा मुलगा मंदार देशमुख यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close