अमरावती

‘जातचोर’ म्हणून काही आदिवासी समुहाची बदनामी करीत असल्याने अमरावती येथे लोकमत ची होळी

अमरावती / प्रतिनिधी

काही विशिष्ट आदिवासी जमाती चे अनु जमातीचे जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फसवणूकीने व लबाडीने अवैध ठरवून ते रद्द केल्यामुळे काही संघटना या आदिवासी समुहाची “जातचोर”या शब्दात बदनामी करून काही वृत्तपत्रांमध्ये बदनामीच्या बातम्या प्रसिद्ध करीत असल्याने आज दि १ नोव्हेंबर रोजी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) या कर्मचारी संघटने तर्फे इर्विन चौक मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर लोकमत या वृत्तपत्राची होळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या जगदीश बहीराच्या निर्णयाचा  चुकीचा अर्थ काढून जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आलेल्या ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढण्यात यावे अशी मागणी काही संघटना करीत आहे. या संघटना यासंदर्भात जातचोर हा शब्द वापरून बदनामी करीत असतात. तथापि वृत्तपत्रे यातील सत्यता न पडताळता जातचोर या शब्दाचा उल्लेख करुन बदनामी कारक बातम्या छापतात. परंतु या अन्यायग्रस्त आदिवासी समुहाची बाजू छापत नाही. असे यावेळी सांगण्यात आले. या वेळी ऑफ्रोहचे सल्लागार डॉ दीपक केदार, मनिष पंचगाम, नरेंद्र ढोलवाडे, शाम टिक्कस, भगवंत पखाले,  निता सोमवंशी, गजानना सुर्यवंशी, देवानंद हेडाऊ, गजानन नारोळकर,  उमक इत्यादि कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close