औरंगाबाद

वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डेन फॉरेस्टची ग्राम सामाजिक परिवर्तन पथकाकडून पाहणी

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत तयार करण्यात आलेल्या घनदाट जंगल ( डेन फॉरेस्ट ) प्रकल्पाची महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन पथकाचे प्रमुखांकडून पाहणी करण्यात आली. पाहणी नंतर पथकांनी समाधान व्यक्त केले. शनिवार दि. 31 रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन पथकाचे सल्लागार स्वप्नील सरदार, बायस मिसेन मॅनेजर दिलीप सिंग, जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रविन पिंजरकर, जिप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, निलेश जाधव, गट समन्वयक आकाश वैराळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे भेट दिली यावेळी अधिकाऱ्यांनी  अधिकाऱ्यांनी अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या (डेनफॉरेस्ट) घनदाट जंगल या प्रकल्पाची पाहणी केली, प्रकल्पांतर्गत लागवड केलेल्या झाडांची होत असलेली समाधानकारक वाढ व वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे यांच्यासह सर्व कर्मचारी यांच्या कडून घेण्यात येत असलेली योग्य काळजी व निगराणी या बद्दल पाहणी पथकाने समाधान व्यक्त केले. या वेळी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बलराज पांडवे, डॉ.भग्येश्री शेळके, एस.पी.वाघ, के. एफ.राठोड,आरोग्य सेविका सी.सी.गवळी, के.पी.वासनिक , सुधाकर बोडखे , कान्होबा झाटे, रवि खंडागळे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनसोड , गतप्रवर्टक ठेंगडे, छाया तुपे, शांताबाई किरतिशाही परिचर यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close