ब्रेकिंग

स्व.इंदिरा गांधी ह्या देशाचे सर्वात कणखर नेतृत्व – आ.डॉ.तांबे

अमृत उद्योग समूहाच्या वतीने इंदिराजी व सरदार पटेलांना अभिवादन

संगमनेर/अमोल भागवत

देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणार्‍या इंदिराजींच्या जिवनकार्याचे विविध पैलू आहेत. त्यांनी घेतलेल्या दुरदृष्टीच्या निर्णयाने सामान्य माणसाला आज पर्यंत दैनंदिन लाभ मिळत असून बँकांचे राष्ट्रीयकरण, हरित व पर्यावरण क्रांती,बांगलादेश निर्मिती असे महत्वपूर्ण निर्णय घेणार्‍या स्व.इंदिराजींचे नेतृत्व देशासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर ठरले असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे. अमृत उद्योग समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या 36 व्या पुण्यतिथी निमित्त व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ हे होते तर व्यासपीठावर लक्ष्मणराव कुटे,संतोष हासे, पं.स.सभापती सुनंदाताई जोर्वेकर, आर.बी.रहाणे, नवनाथ अरगडे, सुरेश थोरात, निर्मलाताई गुंजाळ, साहेबराव गडाख, गणपतराव सांगळे,आर.बी.सोनवणे, सुरेश झावरे, संपतराव गोडगे, विनोद हासे,अनिल काळे,भारत मुंगसे, माणिक यादव,अभिजीत ढोले, रोहिदास पवार,तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे,  प्रा.बाबा खरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, राजहंस दुध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.प्रतापराव उबाळे आदि मान्यवर उपस्थित होते. आ.डॉ.तांबे म्हणाले कि,इंदिराजींच्या दुरदृष्टीमुळे भारतातील मध्यमवर्ग उदयास आला. 1967 साली बँकांचे राष्ट्रीयकरण करुन ग्रामीण भागात बचतीचे महत्व निर्माण झाले.तर हरितक्रांतीमुळे देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासह ग्रामीण भागातून राजकीय नेतृत्व उदयास आले. पर्यावरण संवर्धन, अणुचाचणी, गरीबी निर्मुलन यांसह बांगलादेश निर्मितीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारताचा दबदबा निर्माण केला. देशहिताचा प्रत्येक निर्णय घेतांना त्या डगमगल्या नाहीत.भारतासाठी एक मोठे कणखर नेतृत्व त्यांनी दिले. सुरक्षा व एकात्मतेमध्ये तडजोड केली नाही. धर्म निरपेक्षता ही भारताची मोठी ताकद आहे. एकात्मता व धर्मनिरपेक्षतासाठी स्व.इंदिराजींनी बलिदान दिले.काही गुप्तहेर संघटनांनी अंगरक्षकाकडून धोका असल्याचे सांगितले मात्र त्यांच्यावर अविश्‍वास दाखविला. तर शिख समुदायावर अविश्‍वास दाखविल्या सारखे होईल म्हणून अंगरक्षकांना दुर केले नाही. आणि त्यांनीच त्यांची हत्या केली. सध्या मात्र भाजपाप्रणीत काही संघटनांकडून पंडित नेहरु,इंदिराजी यांच्या सह राष्ट्रपुरुषांची बदनामी केली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे येष्ठ नेते राहिले व त्यांनी आर.एस.एस सारख्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. धार्मिक भावना भडकून देशात तेढ निर्माण करणार्‍या विचारांपासून रायघटना व लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रतापराव ओहोळ म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांच्यावर कायम स्व.इंदिराजी गांधी,महात्मा गांधी,यशवंतराव चव्हाण,सुभाषचंद्र बोस यांसह विविध राष्ट्रपुरषांच्या व्यक्तीमत्वाचा त्यांच्यावर प्रभाव राहिला. या राष्ट्रपुरुषांच्या विचारांची नव्या पिढीला जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने त्यांनी येथे स्व.इंदिरा गांधी यांचे स्मारक म्हणून शक्तीस्थळ उभारले. बालवयात अतिशय संवेदनशील असलेल्या इंदिरा गांधी पुढे देशाच्या कणखर पंतप्रधान बनल्या. 1971 च्या भारत पाकिस्थान युध्दातील कणखरतेमुळे आंतराष्ट्रीय पातळीवरील कणखर नेत्या म्हणून लौकीक प्राप्त झाला असे ही ते म्हणाले. यावेळी सुभाष पा.गुंजाळ,बाबासाहेब गायकर,नानासाहेब शिंदे,विलास कवडे,अशोक हजारे, सौ.सुनंदाताई भागवत,वसंत साबळे,तात्या कुटे,रमेश नेहे,कचरु पवार,कचरु वारुंसे, अ‍ॅड.त्र्यंबक गडाख, के. के.थोरात आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांनी केले. सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थंाचे अधिकारी, कर्मचारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close