Uncategorized

खळबळजनक : सावकाराच्या कर्जाला कंटाळून माजी उपसरपंचानी गळफास घेऊन केली आत्महत्या

आत्महत्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओत अनेकांची नावे, वीडियो झाला व्हायरल

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील चिंचोली-आखातवाडा येथील माजी उपसरपंच तथा गुत्तेदार पोपट उर्फ राधाकृष्ण विठ्ठल बोडखे (47) यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.

यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.मुख्य म्हणजे 10 लाख रुपयाचे व्याजासह 50 लाखांची फेड करुन सुद्धा सावकाराकडून त्रास देणे सुरूच असल्याने त्यांनी स्वतःच्या शेतातातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे गळफास घेण्यापूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये अनेकांची नावे आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.22) पहाटे साडे सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
यावेळी मुलगा मच्छिंद्र राधाकृष्ण (पोपट) बोडखे वय 22 वर्ष व्यवसाय शिक्षण,रा. आखातवाडा ता.खुलताबाद याने पोलीस स्टेशन खुलताबाद येथे हजर होऊन फिर्यादी दिली. यात त्यानी म्हटले आहे की, माझे वडील राधाकृष्ण (पोपट) बोडखे हे शासनाचे काम कॉन्ट्रक्टर स्वरुपात घेत होते त्याचे व्यवहार नेहमी 1) संतोष उत्तमसिंग राजपुत रा. गल्लेबोरगाव 2) बाळु नलावडे रा बाजार सावंगी यांच्या मार्फत चालु होता मध्यतंरी 10 दिवसापुर्वी मी घरी असताना माझ्या ओळखीचे वरील 1) संतोष उत्तमसिंग राजपुत 2) बाळु नलावडे असे आमच्या घरी आले व माझ्या वडीलांना म्हणाले कि तुझ्याकडचे पैसे देवुन टाक असे म्हणुन त्यांनी माझ्या वडील नामे राधाकृष्ण (पोपट)बोडखे यांना शिविगाळ करुन निघुन गेले. नतंर माझे काका नामे मिनीनाथ बोडखे,गोरख बोडखे असे आम्ही घरातील सर्व लोक एकत्र होवुन वडील नामे राधाकृष्ण बोडखे यांना विचारपुस करता त्यांनी कळविले कि मी संतोष राजपुत याच्याकडुन अडीच लाख रुपये पाच सहा वर्षा पुर्वी व्याजाने घेतले होते ते पैसे मी वेळोवळी व्याजा सह त्यांना आतापर्यत पंचेचाळीस लाख रुपये असे एकुण परत दिले होते.तरी सुध्दा संतोष राजपुत हा आणखी पैसे बाकी आहेत असे नेहमी म्हणत होता. तसेच बाळु नलावडे रा.बाजार सांवगी असे आम्ही दोघांनी रेल येथील खडी क्रशर मशिन भागीदारी मध्ये चालविण्यासाठी घेतले होते. तो परस्पर तिकडे खडी विक्री करुन तो मला पैसे दाखवित नव्हता. त्यांने माझ्या कडेच जास्त पैसे निघाले म्हणुन बाळु नलावडे हा मला पैसासाठी तागदा लावत होता. सदरील दोन लोकांचा त्रास मला असहय झाला आहे.असे माझे वडीलांनी आम्हाला सांगितले. तेव्हा पासुन माझ्या वडीलांचा घराच्या लोकांसमोर अपमान झाल्याने ते खुप विचार करीत होते. तसेच स्टोन क्रशर भाडयाने चालविण्यासाठी घेतले होते त्यावेळी व बाळु नलावडे व वडील यांनी दोघांनी दोन स्वतंत्र्य चेक सुरक्षा म्हणुन दिले होते. ते बाळु नलावडे यांनी परत घेवुन परस्पर बँकेत टाकले होते व बाउन्स झाल्यानतंर वडीलांना ब्लॅकमेल करीत होता.तसेच त्याच्याकडे वडीलांनी हायवा व जे.सी.बी कामासाठी दिले होते त्याची कोणत्या प्रकाराची मजुरी दिली नाही.
तसेच वेरुळ येथील अजमेरा यास वडीलांनी जमिन रजिस्ट्री करुन देवुन त्यातुन मिळालेले पैसे संतोष राजपुत यांना दिले आहेत.व वेळोवेळी बँके मार्फत पैस संतोष राजपुत यांना दिलेले आहे.असे वडीलांनी काल मला तसेच माझ्या आईला सांगुन मी संतोष राजपुत व बाळु नलावडे यांना खुप वैतगलेलो आहे.मला आत्महत्ये शिवाय पर्याय नाही.असे म्हणत होते त्यावेळी आम्ही त्यांची समजुत घातली होती.
त्यानतंर बुधवारी दि.22/07/2020 रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मला माझा चुलता मिनिनाथ बोडखे यांनी येवुन सांगितले कि, बापुनी आपल्या शेतातील लिबांच्या झाडाला गळफास घेतला आहे त्यावरुन आम्ही त्याठिकाणी गेलो असता त्याठिकाणी माझे वडील लिबांच्या झाडाला गळफास घेवुन मरणासन अवस्थेत लटकलेले दिसले म्हणुन आम्ही गावक­याच्या मदतीने वडीलांना खाली काढुन सरकारी दवाखान्यात घेवुन गेलो तेव्हा वेरुळ येथील डॉक्टरानी त्याना तपासुन मयत घोषीत केले.त्यानतंर वडीलांनी आत्महात्या करणेपुर्वी त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ क्लीप तयार करुन ती व्हॉयरल केली होती.त्यामध्ये सुध्दा सदरील मजकुर नमुद आहे.
तरी माझ्या वडीलास वांरवार मानसिक व अर्थिक त्रास देवुन आत्महत्येस प्रवृत करुन आत्महत्या करण्यास भाग पाडणारे संतोष राजपुत रा. गल्लेबोरगाव,बाळु नलावडे रा.बाजार सावंगी यांच्या विरुध्द कायदेशीर तक्रार होणेस विनंती आहे. अशी तक्रार खुलताबाद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहेत पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्यामार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची आला आहे. यावेळी बिट जमादार निळकंठ देवरे, सुनील कुमार लहाने, युवराज हिवाळे अधिक तपास करीत आहेत.

व्हायरल व्हिडिओ मध्ये अनेकांची नावे

आत्महत्येपूर्वी पोपट बोडखे यांनी आपल्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ बनविला आहे.त्या मध्ये त्यांनी राजपूत आणि नलावडे अशा दोन सावकार ची नावे घेतली आहे. व त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.शिवाय एका शाखा अभियंता बिल काढण्यासाठी त्रास देत असल्याचे देखील म्हंटले आहे याचं बरोबर त्यांनी उधार दिलेल्या लोकांची नावे आणि रक्कमचा उल्लेख आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close