Uncategorized

अडगाव बु ते दाणापुर रोडवरील मालठाणा बु गावालगच्या कायम स्वरुपी उपाय योजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जि.प.सदस्या संगिता अढाऊ यांनी कलेक्टर दिले निवेदन

Spread the love

तेल्हारा/प्रतिनिधी

अडगाव ते दानापुर रत्यावरील मालठाणा बु!गावाजवळील वाहणार्‍या मोठ्या नाला पुराच्या नुकसानीचे कायम स्वरुपी उपाय योजना बाबत मालठा शेतकरी, मालठाणा गाववाशीयांच्या समस्या मार्गी लागाव्या व समस्यातुन मुक्त होण्या साठी जि.प.सदश्या संगिताताई अढाऊ अतोनात प्रयत्न करित आहेत. कलेक्टर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना निवेदनाव्दारे अडगाव बु!ते दाणापुर या रोडवरील मालठाणा गावालगत सातपुढ्यावरुन वाहत येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह मोठा नाला. या नाल्यावर गेल्या कित्येक वर्षापासुन पुर येऊन या पुराचे पाणी आजुबाजुच्या शेतात फुटुन फार मोठ्या प्रमानात शेतीचे नुकसान होते. या सदर्भात दि.१४ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. पुलाच्या खाली पाण्याचा विसर्ग होण्याचा मार्ग हा अतीशय अरुंद असुन हा पुल येणार्‍या पाण्यापासुन होणार्‍या शेतीच्या नुकसानित वाढ झालेली आहे. सदर पुलाच्या आजुबाजुच्या अर्ध्या पेक्षा जास्त भाग खचलेला असल्यामुळे या भागातुन पाणी मालठाणा बु! गावात घुसुन अनेक घरांची पडझड दरवर्षी होत असते सदर पुलाच्या ना दुरुस्तीमुळे या वाहतुकीच्या रोडवर अपघातासारखी अप्रिय घटना घडु शकते. या रोडवर शालेय विद्यार्थ्यांची सतत वाहतुक चालु असते. मालठाणा परिसरातील शेतकर्‍यांनी आपली शेती कवडीमोल भावानी या ञासामुळे विकलेली आहे.तर शेकडो एकर शेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे.या संदर्भात अनेक वेळा तक्रार निवेदने दिलेली आहे. सन्मानिय आमदार,खासदार , गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग अधिकारी, तहसिलदार इत्यादी महोदयांनी गावाला व शेतीला भेटी दिल्या आहेत. आमची विनंती आहे की अडगाव बु!ते दाणापुर रोडवरील मालठाणा बु!गावालगच्या कायम स्वरुपी उपाय योजना करुण परिसरातील शेती, मालठाणा वाशीयांमध्ये व रहदारी करणार्‍यांना न्याय द्यावे.अशा आशयाचे निवेदन संगिताताई अढाऊ, सदस्या जि.प.तळेगाव सर्कल मो.इद्रीस मो.कुद्दुस सदक्ष्य पं स, ईत्यादी सह्या निशी निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close