Uncategorized

तिसगाव येथील रणसंग्राम गणेश मंडळातर्फे रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या वाटप

Spread the love

वाळूजमहानगर/प्रतिनिधी
आज दि. १५ जुलै २०२० रोजी औरंगाबाद पोलीस आयुक्त यांचा संयुक्त उपक्रम कोरोना विषाणू (COVID-19) पासून रक्षण करणारे होमोओपॅथिक आर्सेनिक अल्बम ३० ( रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोळी) मोफत वाटप तिसगाव येथे करण्यात आले. या मध्ये तिसगाव मधील रणसंग्राम गणेश मंडळा तर्फे त्या गोळ्या गावातील प्रत्यके घरात पोहचवण्यात आल्या त्याच बरोबर त्या गोळ्या कशा प्रकारे घ्याव्यात ते ही समजावून सांगण्यात आले, गावामध्ये कोरोनाचे संकट पाहून त्याला न घाबरता रणसंग्राम मंडळाच्या सर्व सदस्यांनी पूर्ण पणे काळजीपूर्वक गावातील परिस्थिती हाताळत आहे कोणाला ही कसल्याही प्रकारची गैर सोय होणार नाही याची पूर्ण पणे काळजी घेतली जात आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महानगर पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, डॉ. लाहोटी (उद्योजक) पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक निंभोरे, शेख, पो. शि. नेहा वायभट, तसेच आमच्या गावचे पो. शि गौतम जाधव व इतर सहयोगी संस्था यांनी यापूर्वीही गावांमध्ये रेशन किट वाटप केले होते व आज गावामध्ये कोरोना चे संकट येऊन ठेपले त्याला सामोरे जाण्यासाठी रणसंग्राम गणेश मंडळ पुढे आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close