Uncategorized

खुलताबादेत पावसाची रिपरिप पिकांची जोमदार वाढ, अधिकच्या पावसाने काही ठिकाणी पिके कोमात

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यात दोनतीन दिवसाच्या उघडीप नंतर पावसाने प्रथमता जोरदार व नंतर रिपरिप लावून धरली असुण खरिप पिकांची झपाटय़ाने जोमदार वाढ होत आहे. तर काही ठिकाणी परिसरात अधिकच्या पावसामुळे पिके कोमात गेली असल्याचे चित्र आहे. वेळेवर पाऊस पाणी, लागवड – पेरा, पेरालगवड पुर्वी व नंतर मेहनत अंतर मशागत, निंदणी खूरपणी, खते टाकणी, वखरणी, कोळपणी बरोबरच वेळेवर पाऊसपाणी मिळत असल्याने खरिप पिके अतिशय जोमदार पणे वाढ करत असुण चांगल्या अवस्थेत पिके हिरवेगार, टवटवीत, बहरले आहे. एक नंबर मधे मका पीक जोरदार वाढ करून आहे. तर कापुस, सोयाबीन, बाजरी, तुर, भुईमूग, मुग – उडीद खरिप पिके भरभराटीस आहे. यंदा पावसाची जबरदस्त कृपा असुण अवकाळी, रोहीण्या, मृग बरोबरच सर्वच नक्षत्राचे पाऊस एक दोन दिवसाची उघडीप देत पाऊस पुन्हा सक्रीय होऊन पाणीच पाणी करत आहे. त्यात एकदोन दिवसाच्या पाऊस उघडीपमुळे शेतकऱ्यांना पिक अंतर्गत मशागतला वेळ मिळतो व पिकांची मेहनत होताच पाऊस पुन्हा सक्रीय होतो. त्यामुळे पिके जबरदस्त वाढ करून आहे. यात बोडखा, इंदापूर, शेखपुर , येसगाव, ताजनापूर क्षेत्रात काहीकाही ठिकाणी जास्तीचे पाऊस झाल्याने तेथील खरिप पिके पिवळी पडली असुण त्यात पाणी तुंब धरून असल्याने पिके कोमात गेली आहे. व त्यात पावसाची फटकेबाजी सुरूच असल्याने त्या पिकांना फटका बसतो आहे. तर सद्या समाधानकारक पावसामुळे नदी, नाले – ओढे, वाहते झाले तर बांध, तलाव, प्रकल्प, विहिरींना पाणी साठा उपलब्ध झाला आहे. झालेल्या व होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे (बळीराजा) शेतकरी एकदम खुश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close