Uncategorized

स्थानिक प्रशासनाने लावलेली ताळेबंदी तत्काळ रद्द करा-अनिता वानखेडे

Spread the love

पैठण / प्रतिनिधी

पैठण तालुक्यात स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात येणाऱ्या ताळेबंदी मूळे स्थानिक रोजंदारी ने कमावणाऱ्या मजूर आणि शेतकरी वर्गाला या मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या आधीही शहर व तालुका प्रशासनाने जनतेचा व शेतकरी वर्गाचा विचार न करता काही निकटवर्ती व्यापाऱ्यांना लाभ देण्यासाठी ताळेबंदी लावली होती ज्याची उच्चस्तरीय चौकशी बाबत ची कार्यवाही मा.गृह सचिव यांचा कडे प्रलंबित असताना आता पुन्हा ताळेबंदी करण्यात आलेली आहे .गेल्या सहा महिन्यांपासून जनता , मजूर आणि शेतकरी वर्ग या ताळेबंदी मुळे होणाऱ्या नुकसानी मुळे आधीच हवालालदिल झालेला आहे.उपासमारी मूळे नागरिक त्रस्त झाले आहेत तरी सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सध्याची ताळेबंदी तत्काळ रद्द करावी.अशी मागणी राष्ट्रवादीच्या अनिता पा.वानखेडे यांनी आपल्या निवेदनात केली आहे तसेच या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त यांना ही पाठवण्यात आली असल्याची माहिती अनिता वानखेडे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close