Uncategorized

खुलताबाद तालुक्यात युरिया खताची टंचाईमुळे शेतकरी राजा चिंतातुर

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबादेत यंदा सुदैवाने वेळेवर पाऊस झाला. लागवड व पेरा ही झाली पिके ही चांगली आली असताना मात्र युरिया खत टाकण्याच्या गरज असताना अचानक खते गायब झाल्याने शेतकरी परेशान झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांनी वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खुलताबाद तालुक्यात वर्ष – २०२० – २०२१ खरिप पिक हंगामासाठी यंदा वेळेवर अवकाळी, रोहीण्या, मृग नक्षत्राचे व सद्या जोरदार – दमदार पाऊस सुरू आहे. वेळेवर लागवड – पेरा  झाल्याने यंदा जोरदार पिके आहे. खरिप पिक हंगाम पुर्वी व पावसा नंतर शेतकऱ्यांनी जोरदार मेहनत घेतली व त्यामुळे पिके जोरदारपणे वाढ करून आहे. यात खरिप पिके खतावर आले असताना तालुक्यातून युरिया खतच गायब झाले आहे. शेतकरी युरिया ची मागणी करत असताना कृषी दुकानदार कडून युरिया खत उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळत आहे. जोमदार पिके, समाधानकारक पाऊस असताना आता युरिया खताची तुटावडा निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी खासदार, आमदार यांनी लक्ष घालून तातडीने वेळेवर युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close