Uncategorized

मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे- भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

मुदती पूर्व मका खरेदी केंद्र बंद केले आहे ते तात्काळ सुरू करण्यात यावे. व मुदत वाढवून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने तहसीलदार राहुल गायकवाड यांना देण्यात आले. मका खरेदी केंद्र 15/07/2020 पर्यंत सुरू ठेवण्यात शासनाचे आदेश होते परंतु अचानक 13/07/2020 रोजी जिल्हाअधिकारी औरंगाबाद यांनी मका खरेदी बंद केली आमचे मकाचे टारगेट पूर्ण झाले आहे असे सांगितले , आणि मका खरेदी कन्द्रे बंद केले आणि शेतकाऱ्यांना संदेश देऊन मका खरेदी करू नये असे सांगितले आहे कुठलीही पूर्वसूचना शेतकऱ्यांना न देता असे सांगणे चुकीचे आहे मका खरेदी केंद्र मुदतीच्या पूर्वी बंद केल्यामुळे शेतकरी अत्यंत भांबावून गेला शेतकऱ्यांनी टेम्पो व ट्रॅक्टर मध्ये मका घेऊन खरेदी केंद्रावर गाड्या सध्या उभ्या केलेल्या आहेत एकूण ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांपैकी अजून 270 शेतकऱ्यांची मका खरेदी करणे बाकी आहे म्हणून आमची सर्व खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा अधिकारी औरंगाबाद व राज्य शासनाला विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे जी मका शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणली आहे ती मका तात्काळ खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांची मका पावसात भिजनार नाही जी मका आणली आहे ती गाडी वाहणे भाड्याची आहेत शासनाने मुदतीपूर्वी अचानक निर्णय घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे तरी शासनाने लवकरात लवकर खरेदी सुरू करावी व राहिलेली मका खरेदी करण्यात यावी ही विनंती व राहिलेली मका खरेदी करण्याला मुदतवाढ देण्यात यावी. यावेळी तहसीलदार कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे पंचायत समिती सभापती गणेश अधाने पंचायत समितीचे माजी उपसभापती दिनेश अंभोरे सभापती अरुण आघाडे सरपंच कृष्णा चव्हाण अरुण हिवरडे नगरसेवक योगेश बारगळ, परसराम बारगळ,संतोष गायकवाड, संतोष भुशिंगे यांच्या उपस्थित तहसीलदार राहुल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close