Uncategorized

खुलताबाद शहरासह तालुक्यात ही कोरोनाचा चढ़ता आलेख कायम, बुधवारी पुन्हा आढळले अकरा नवीन रुग्ण

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद शहरा पाठोपाठ आता कोरोना विषाणुने ग्रामीण भागात देखील डोके काढले असुन तालुक्यातील अनेक गावांमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.
बुधवारी (ता.15) खुलताबाद शहरात एक तर तालुक्यात दहा कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन व जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यात एकूण नवीन अकरा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने खुलताबादकरांची चिंता वाढली आहे. बुधवारी खुलताबाद शहरातील मोठीआळी येथील एका 40 वर्षीय पुरुषाचा तर पळसवाडी येथील सात, वेरूळ येथील तीन असे एकूण अकरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. खुलताबाद शहरात तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे शोध घेऊन भक्त निवास येथे क्वारंटाइन करून नियमाप्रमाणे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहेत तर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घर परिसर सील करण्याच येत आहेत यावेळी पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप, वेरूळचे वैद्यकीय अधिकारी डॉ बलराज पाडवे सह पोलीस अधिकारी ए. पी.आय. मोरे, पोलीस कर्मचारी भावसिंग जारवाल, यतीन कुलकर्णी आदि उपस्थीत होते.तर या वेळेस, न.प कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ, नगरपालिका कर्मचारी अंकुश भराड, शहेजाद बेग सह इतर कर्मचाऱ्यांनी परिसर सील केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close