Uncategorized

राज्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा असताना संगमनेरात मात्र शेतकी संघाच्या प्रयत्नाने शेतकर्‍यांना दिलासा

Spread the love

संगमनेर /अमोल भागवत
रायात व देशात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला होता. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने संपूर्ण रायामध्ये युरिया व रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या तुलनेत महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकी संघाच्या वतीने सोशल डिस्टन्स चे पालन करत दररोज एक हजार शेतकर्‍यांना यूरीया चे वाटप करून युरिया पुरवला जात आहे. संगमनेर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने दरवर्षी पाच हजार टन युरिया खताची आवश्यकता तालुक्यासाठी असते. याचे नियोजन मागील अनेक वर्षांपासून महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यापासूनच दर वर्षी करण्यात येत असते. त्यामुळे दरवर्षी रायात कशीही परिस्थिती असली तरी संगमनेरकरांना मात्र वेळेवर युरिया सह रासायनिक खते उपलब्ध होतात. शेतकी संघाच्या मार्फत तालुक्यातील विविध सोसायट्या, कृषीसेवांतून शेतकर्‍यांना हे खत पुरवले जाते. शेतकी संघाकडून आजवर एक हजार टन युरियाचे वाटप केले गेले आहे. मोठ्या प्रमाणात आता युरिया सुद्धा आरक्षित केला गेला आहे येत्या 4 ते 5 दिवसात तो युरिया शहरात येईल व ग्रामीण भागात देखील सोसायटी व कृषीसेवांमार्फत मार्फत देखील शेतकर्‍यांना युरियाचे वाटप केले जाईल. या वर्षी मात्र देशात व रायात आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला.त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मार्च ते जुलै पर्यंतच्या काळात युरिया मिळण्यास विलंब झाला कारण रायात गंभीर परिस्थिती असल्या कारणाने. सध्या शेतकर्‍यांची यूरीया साठी मागणी मोठी असून त्या प्रमाणात खतांचा पुरवठा होत नाही. युरिया व रासायनिक खते निर्मिती व वितरण व्यवस्था ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांच्याकडूनही महाराष्ट्राला पुरेसा खत पुरवठा होऊ शकला नाही. रायात युरियाचा प्रचंड तुटवडा असताना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मात्र संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी विशेष प्रयत्न करून काही प्रमाणात युरिया खत मिळवली संगमनेर शेतकी संघ हा शेतकर्‍यांचा हक्काचे ठिकाण असल्याने या मार्फत शेतकर्‍यांना खतांचे वितरण व्यवस्था करण्यात येत आहे.शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात,उपाध्यक्ष संपतराव डोंगरे त्यांचे सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापक अनिल थोरात यांच्या प्रयत्नातून दररोज एक हजार शेतकर्‍यांना व्यवस्थित लाईन मध्ये टोकन देऊन खत पुरवठा केला जात आहे .या सर्व काळामध्ये सोशल डिस्टंसिंग ही पाळले जात आहे. तुटवड्याच्या काळात प्रामाणिकपणे काम करणार्‍या शेती संघाकडून संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत आहे. रायाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात दररोज आढावा घेत असतात. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना युरिया खत मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे युरिया व इतर खतांची मागणी केली असून लवकर खत पुरवठा सुरळीत होईल असा विश्वासही शेतकी संघ व व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close