Uncategorized

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांना संधी द्यावी – विश्वासराव आरोटे

Spread the love

संगमनेर/अमोल भागवत

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. राजकीय कार्यकर्त्यालाच ही संधी पुन्हा मिळणार आहे. पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे. पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते. त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो , त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विश्वासराव आरोटे म्हणाले की , जिल्ह्याचे पालक मंत्री व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या त्या गावातील पत्रकाराची नेमणूक करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेकडून केली जात आहे. तसेच ज्या गावात पत्रकार नसेल त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close