Uncategorized

राजगृह वास्तृच्या तोडफोडीच्या निषेधार्थ भडगाव येथे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन

Spread the love

प्रतिनिधी/ चंदू खरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह वास्तृच्या तोडफोडीच्या निषेधार्थ भडगाव तालुका रिपाई चे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून या विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारकडून कठोरात कठोर कार्यवाही केली जावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा यांनी भडगाव तहसिलदार आंधळे मॅडम व पोलीस निरीक्षक धनंजय वेरुळे यांना दिले. या निवेदनात असेही म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी बौध्दासाठी एक महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापी संपवू शकत नाही. त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केल जावे. या शिष्टमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा, उपाध्यक्ष ईश्वर बाविस्कर, वाल्मिक लोखंडे, चंद्रमनी बाविस्कर, एकनाथ अहिरे, संजय खैरनार ,कामगार आघाडी अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी, युवा नेते गुरुदास भालेराव, सचिन बागूल ,धोंडू राखूनडे, राजू फासगे, मधुकर खैरनार, गौतम मोरे, दिलीप बाविस्कर, मधुकर बाविस्कर यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close