औरंगाबाद

खुलताबाद तालुक्यातील शेतकरी विमा पासून वंचित, मुख्यमंत्री कडे तक्रार,चालढकल केल्यास आत्मदहनचा इशारा

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी व अधिकच्या पावसामुळे सन 2019 – 2020 मध्ये खरिप पिके वाया जावुन ही विमा कंपनीने दावा मंजुर न करता शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई पासून विचंत ठेवले. जेव्हा की औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळाली. परंतु खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कडे दाद मागितली असूण कंपनी विरूध्द शेतकऱ्यातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सन – 2019-2020 या आर्थिक वर्षांत शेतकऱ्यांनी लाखो रूपये भरुन खरिप पिके कापुस, मका, तुर, भुईमूग, मुग खरिप पिकांचा विमा घेतला. यात प्रथमता पावसाअभावी खरिप पिके वाळून गेली. तर शेवटच्या टप्प्यात अधिकच्या पावसामुळे व परतीच्या व अवकाळी पावसाने खरिप पिके सडून वाया गेली. या संदर्भात शासनाने व प्रशासनाने यास शेतकऱ्यांची विशेष बाब म्हणून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली. मात्र शेतकऱ्यांनी पिक संरक्षण म्हणून विमाचे पैसे भरून कवच घेतले होते. व वास्तविक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानही झाले होते. असतांना खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही. व हेतुपुरस्कर शेतकऱ्यांना वंचित ठेवले. विशेष बाब म्हणजे औरंगाबाद जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांना विमा कंपनी कडून नुकसान भरपाई मिळाली मग खुलताबाद तालुक्याला शेतकऱ्यांना का. वंचित ठेवण्यात आले?. यासंदर्भात विशेष बाब म्हणजे मा.आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर च्या शेतकऱ्यांसाठी कंपनी कडून विमा ची नुकसान भरपाई घेतली. मग खुलताबाद च्या शेतकऱ्या साठी का. नाही? . असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. आमदार दोन्ही तालुक्याचे असताना व तालुक्यात खरिप पिकांचे खरोखर नुकसान झालेली असताना वंचित ठेवण्याचे व नुकसान भरपाई नाकारण्याचे कारणच काय?. याबाबत शेतकऱ्यात प्रचंड रोष व्यक्त केला. व बाजारसावंगी येथील अनेक शेतकऱ्यांनी मोठया संख्येने एकत्रित येऊन बैठक घेऊन अॅग्रो विमा कंपनी विरुद्ध मुख्यमंत्री कडे न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांनी निवेदन केले आहे. तसेच चालढकल केल्यास खुलताबाद तहसील समोर सामुहीक आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आदिकडे निवेदन द्वारे न्याय मागितला आहे. व हक्काची नुकसान भरपाई मिळावीच अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदन द्वारे केली आहे. या निवेदनवर जेष्ठ समाजसेवक पुंजाजी आण्णा, भिमराव नलावडे, चेअरमन औटे, व्हा. चेअरमन राजु भाऊ चंदवाडे, अप्पा साहेब जाधव, कैलास दहातोंडे, अण्णा नलावडे, भागिनाथ निकम, मोहनसिंग राजपुत, डॉ. गिरी सह शेकडो शेतकऱ्यांचे सह्यां निवेदनवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close