औरंगाबाद

केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात खुलताबाद येथे कांग्रेस कडुन निदर्शने

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

तालुका कांग्रेस पक्षाच्यावतीने केंद्र शासनाच्या पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीच्या विरोधात तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळेस कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव काळे, मा जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, मा.रविंद्र काळे, नगराध्यक्ष एस.एम क़मर ,माजी तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोसरे, जेष्ठ नेते आबेद जहागीरदार, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरैशी, सेवा दल तालुका अध्यक्ष निलेश पवार, शहर अध्यक्ष अब्दुल समद आदींची उपस्थिती निवेदन तहसीलदार राहुल गायकवाड यांना देण्यात आले.कांग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज भारतामध्ये कोरोनासारखी भयंकर महामारी पसरलेली असून संपूर्ण जनता त्यामुळे त्रस्त झालेली असून, सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी वर्ग यांचे आर्थिक उत्पन्न जवळपास नसल्यात जमा आहे. सर्व जनता आर्थिक अडचणीत सापडली असून गोरगरीब जनता पैशा पैशासाठी अक्षरशः त्रस्त आहेत. अशा प्रचंड बिकट परिस्थितीमध्ये केंद्रात असलेल्या भाजपा सरकारने संपूर्ण जनतेस वेठीस धरले असून दर दोन तीन दिवसाला डिझेल व पेट्रोलचे प्रचंड दर वाढ करत आहेत. सदरील झालेले दरवाढ सामान्य जनतेला आज परवडणारे नसून त्यामुळे नागरिकांमध्ये अत्यंत जन आक्रोश निर्माण झालेला आहे. जागतिक स्तरावर क्रुड ऑईलचे दर अत्यंत खालच्या घरात आलेली असून ऐतिहासिक अशी मंदी असतानासुद्धा भाजपा शासन इतके प्रचंड दर वाढवत आहेत, हा देशातील कांग्रेस पक्षाचा त्यांना सरळ प्रश्न आहे. त्यामुळे तालुका कांग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आक्षेप नोंदण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close