औरंगाबाद

‘राजगृह’ वरील हल्ल्याचा खुलताबाद येथे आर.पी.आय च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

दादर मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ वर काही माथेफिरु लोकांनी पुरातन वस्तूंचा नाश केला. या घटनेचा संपूर्ण राज्यासह खुलताबाद तालुक्यातील गावगावात निषेध व्यक्त केला जात असुन रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (A) च्या वतीने खुलताबाद तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला असुन माथेफिरुस तात्काळ अटक करुन कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राजगृह ही एक इमारत नसून तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान आहे. या वास्तुत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तु व ग्रंथसंपदा आहे. या वास्तुवर हल्ला करणारे माथेफिरू हे देशद्रोही आहेत.राजगृहावरील हल्ला करुन पुरातन वस्तूंचा, झाडांच्या कुंड्या ची तोडफोड करण्यात आली आहे. जर हे माथेफिरू राहगृहात गेले असते तर आतही नुक्सान केले असते. म्हणून या प्रकरणीची तात्काळ चौकशी करुन दोषी असलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात नमूद केली गेली आहे. या वेळेस आर.पी.आय चे तालुका अध्यक्ष फकीरराव भालेराव, सदाशिव दिवेकर, मनोज कुचे,ज्येष्ठ नेते संजय जाधव, सीताराम पठारे आदि उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close