औरंगाबाद

भविष्य निर्वाह निधी BDS प्रणाली राज्यस्तरावरून पुन्हा कार्यान्वित

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

कोरोना/कोव्हीड-19 संक्रमण सुरू झाल्यापासून भविष्य निर्वाह निधीची अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली(BDS) राज्यस्तरावरून बंद करण्यात आलेली होती. परिणामी राज्यातील फेब्रुवारी पासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे अंतिम प्रदान झालेले नव्हते. तसेच अनेक शिक्षक/कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतून परतावा/नापरतावा अग्रीमची मागणी केली होती. ती सर्व परतावा/नापरतावा प्रकरणे मंजूर होऊनही प्रदान झालेली नव्हती. कोकणात निर्सग वादळामुळे अनेकांचे घरांचे प्रचंड नुकसान व पडझड झाल्याने घराची दुरुस्ती आवश्यक होती. त्यामुळे तेथील शिक्षक/कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीमधून परतावा/नापरतावा अग्रीमची मागणी केली होती. उपरोक्त बाब आणि निकड लक्षात घेता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन सादर करून लक्ष्य वेधले होती. अखेर पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्यस्तरावरून अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली(BDS )कार्यान्वित करून असंख्य प्राथमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड ,नितीन नवले, शामभाऊ राजपूत , शालीकराम खिस्ते , गुलाब चव्हाण , विष्णू भंडारे , जावेद अन्सारी , मोहन्मद गौस , रऊफ पठाण , किसन जंगले , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतिश कोळी ,चंदु लोखंडे , कडुबा साळवे ,बबन चव्हाण ,अर्जुन पिवळ ,अशोक डोळस ,के डी मगर, दिलीप ढमाळे ,प्रकाश जायभाये , निंबा साळुंके ,कैलास ढेपळे, अंकुश वाहुळ,जहांगीर देशमुख ,पंजाबराव देशमुख ,दत्ता खाडे , विलास साळुंके , सुनिल बोरसे ,पंकज सोनवणे ,पंकज सोनवणे, विलास चव्हाण,शिलाताई बहादुरे ,फातेमा बेगम, मंगला मदणे , वर्षा देशमुख ,शितल भडागे ,प्रतिभा राणे, वैशाली हिवर्डे, आदी पदाधिकाऱ्यांनी याबाबत आभार व्यक्त केले आहे. अनुदान कमी असल्याने अडचणी येणार;शिक्षक समिती अनुदान वाढविण्यासाठी आग्रही:-राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close