औरंगाबाद

खुलताबादमध्ये पावसाची तूफान बॅटींगमुळे गिरिजा प्रकल्पात पाणीपातळीचा स्कोर वाढला

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीमुळे काही दिवस संपूर्ण जगभरात लॉकडाऊन पहायला मिळाला. याचा प्रदूषणावरही मोठा परिणाम झाला म्हणून यावर्षी चांगल्या प्रकारे आणि तोही अगदी वेळेवरच मॉनसून होण्याचा अंदाज़ हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार मॉनसूनने महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण खुलताबाद तालुक्यात यावर्षी वेळेवर हजेरी लावली. मागच्या आठ दिवसांत खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारी रात्री तर खुलताबादमध्ये पावसाने तूफान बॅटींग केली. यामुळे शहरसह तालुक्यातील अनेक भागात पाणीच पाणी साचले होते. वरुणराजाने खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना ही चांगला दिलासा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच यसगांव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. गिरिजा मध्यम प्रकल्प 100% भरावे अशी अपेक्षा आता प्रत्येक खुलताबादकर ची आहे.कारण प्रकल्प पुर्णता:कोरडा पडला होता. मात्र दमदार पाऊसमुळे गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

शेतकऱ्यांना आणखी पावसाची अपेक्षा
गेल्या अनेक वर्षांपासून असे ओढे पाण्याचे खळखळुन वाहिले नवहोते. यावर्षी असाच चांगला पाऊस झाला तर दुष्काळाचे सावट कमी होईल, अशी अपेक्षा खुलताबादकरांना आहे. जर पाऊस असेच सुरु राहिले तर गिरिजा प्रकल्प लवकरच ओवरफ्लो होण्यास वेळ लागणार नाही अशी प्रत्येक नागरिक व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या पावसाने बाजारसावंगी, टाकळी रा.रा.,भडजी, वेरूळ, कसाबखेडा, पळसवाडी, आदि भगांतील शेतकऱ्यांना यंदा पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close