औरंगाबाद

खुलताबाद शहरातील एस.बी.आय बँकेसमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमाचे पालन करण्याच्या सक्तीच्या सुचना प्रशासनाने कितीही दिल्या असल्या तरी लोक मात्र नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.सोमवारी (दि.29) खुलताबाद शहरातील बँकांसमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.नागरिकांमध्ये कसल्याही प्रकारचे अंतर दिसून आले नाही. एकीकडे खुलताबाद तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांंच्या संख्येत वाढ होतेय व दुसरीकडे असे नियम पाय मल्ली होताना दिसून येत आहे.
खुलताबाद शहरातील SBI बँकेसमोर नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स दिसत नसून पैसे काढण्यासाठी नागरिक एकमेकांमध्ये कुठलेही अंतर न ठेवता गर्दी करताना दिसत आहे. सदरील बँकेत नागरिक एकत्र रांगेत उभे असून सोशल डिस्टन्सचे नागरिकांना काहीही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे. मागील चार-पाच दिवसांपूर्वीच खुलताबाद शहरात पाच कोरोना रुग्ण आढळून आले होते तर शहरसह तालुक्यात दोन कोरोना रुग्ण दगावले होते.यामुळे तालुक्यातील सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे असे प्रशासनाचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहे.परंतु नागरिक सोशल डिस्टन्स पाळत नसून या प्रकारामुळे ग्रामीण भागात कोरोना च्या रुग्णात वाढ होउ शकते. शहरात तसेच ग्रामीण भागात नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र दिसत आहे.तसेच शहरातील इतर बँकेतही अशाच पद्धतीची गर्दी दिसून येत आहे. दिवसोंदिवस कोरोनाच्या संख्येत वाढ होत असुन यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा शर्यतीचे प्रयत्न करत आहे. असे असतांना ही कोरोनावर डोकच काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु हे असतांनाही या कोरोनला हरविण्यासाठी सोशल डिस्टेंसींग अती महत्वाचा असल्याचे प्रशासनाकडून व आरोग्य यंत्रणेकडुन वारंवार सुचना दिले जात आहे. तरीसुद्धा शहरातील बँकेसमोर गर्दी होत आहेच.यामुळे कोरोनाचा प्रभाव आता ग्रामीण भागात सुद्धा होऊ लागल्याने नागरिकांनी गांभीर्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. नस्ता तालुक्यात गंभीर परिस्तिथी निर्माण होऊ शकते. तरी या गंभीर घटनेकडे तालुका प्रशासनाने तक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close