औरंगाबाद

कोविड-19 च्या सर्वेसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करावे – शिक्षक समितीची मागणी

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात सध्या कोविड-19 ने धुमाकूळ घातले असताना औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन ड्युटी म्हणून मा.विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कोविड प्रतिबंधात्मक कामासाठी प्राथमिक शिक्षकांना चेक पोस्ट,नोडल ऑफिसर, स्वस्त धान्य दुकानात निरीक्षक,व नियंत्रक म्हणून खुलताबाद तालुक्यात महिला शिक्षिकांनाही नियुक्त केलेले आहे.औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील रेड झोन मध्ये कंटेनमेंट एरिया संरक्षक म्हणून नियुक्त्या दिल्या आहेत, तसेच दि 27 जून रोजी वाळुज , पंढरपूर , बजाज नगर व रांजणागाव शेणपुंजी या भागात कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात या भागातील कोरोनाच्या सव्हें साठी औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील ठराविक पाचशे शिक्षकांना बोलावून सव्हें करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत.त्यांचे प्रशिक्षणही पार पडले.त्यामुळे शिक्षक वर्गात नाराजीचा सुर आहे,कारण वाळुज औदयोगिक परिसरातील स्थानिक कर्मचारांना हा सव्हें न देता या परिसरा पासून चक्क 60 कि. मी.अंतरावरील शिक्षकांना सव्हें करण्याच्या संदर्भात सुचना दिल्या आहेत. वाळूज औदयोगिक परिसर येथील लोकसंख्या मोठी असली तरी या क्षेत्रात असंख्य खाजगी अनुदानीत शाळा, वेगवेगळी कार्यालय, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर असतांना फक्त जि.प. शिक्षकांनाच सव्हें चे काम आणि चक्क 60 कि.मी अंतरावरून अपडाऊन करून सर्वे करण्यासंदर्भात सुचना दिल्यामुळे व अगोदरच दोन महीने होत आले असताना.मागील मे महिन्याचे वेतन मिळाले नसताना प्राथमिक शिक्षक आर्थिक विंवचनेत सापडला आहे. त्यामुळे दुसऱ्या एरियातून जाणे येणे करून शक्य नाहीच. याच कारणामुळे सर्व जि.प. शिक्षक वर्गात प्रशासना विरोधात नाराजीचा सुर उमटत आहे. कारण ग्रीन झोन मधील कर्मचाऱ्यांना रेड झोन मध्ये सर्वेक्षणला पाठवून यातील काहींना सव्हे करताना जर कोरोनाची बाधा झालीच तर,सव्हें करणाऱ्या शिक्षकामुळे तो ज्या भागात राहतो त्या भागात सुध्दा कोरोना वाढू शकतो,लवकरच प्रशासन अनलॉक 2 मध्ये शाळा सुरू करण्याच्या बेतात असल्याचे दिसून येत आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वे करणाऱ्या त्या त्या शिक्षकांना 14 दिवस क्वारंटाईन करून च शाळेसाठी पाठवले जाईल.शाळा बंद शिक्षण चालू हा उद्देशच सफल होणार नाही अशी आशंका वाटते. प्रशासनाने जिल्हातील सर्व गावामध्ये कोरोनाचा सव्हें एकदाच वेळी एकाच कालावधीत करावा व ज्या भागात जे शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत त्या भागाचा सव्हें तेथील स्थानिक कर्मचाऱ्यांनाच द्यावा.आणि सदरिल पुर्ण जिल्हयाचा सर्व्हे करताना फक्त जि.प शिक्षक यांनाच वारंवार कामाला न जुपंता,त्या भागात कार्य करणारे खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षक, कॉलेज मधील सर्व कर्मचारी, वेगवेगळ्या कार्यालयातील कर्मचारी,आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका व जो कर्मचारी शासनाकडून वेतन घेत आहे अशा सर्वच कर्मचाऱ्यांना सुध्दा या कामी नियुक्त करावे. अशी मागणी शिक्षक समिती कायमच करीत आला असतांना जि.प.प्रशासन फक्त प्राथमिक शिक्षकांनाच आदेश जारी करत आहे. प्राथमिक शिक्षकची कामाला ना नाहीच पण किती दिवस?एकाच विभागाकडून आपण कार्य करुन घेणार आहात.आमच्याच बाबतीत सवतसुभा का? अशी विचारणा शिक्षक समिती करीत आहे. जि प शिक्षकांनी आजपर्यंत औरंगाबाद जिल्हयाची परिस्थिती लक्षात घेऊन मागील तीन महिन्यापासून आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले आहेत परंतु वारंवार जि प शिक्षकांनाच नियुक्ती देत असल्या मुळे जि. प. शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या अगोदर ही शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, महसुल मंत्री, आरोग्य मंत्री,जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना इ मेल द्वारे निवेदन देऊन मागणी केली होती की, या कामासाठी फक्त प्रशासन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच जाणीवपुर्वक सलग तिन महिन्या पासून त्याच-त्या शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे काम सुरू आहेत. यामुळे स्वतः शिक्षक व त्यांचे कुटुंबातील सदस्य यांना यामुळे असुरक्षित वाटत आहे. जि.प.शिक्षकांच्या नियुक्त्या चे ठिकाण दुसऱ्या भागात आणी ग्रीन झोन मध्ये असतांनाही आता तर प्रशासन सव्हें साठी चक्क 60 कि.मी दुर रेड झोन नियुक्ती देत असल्यामुळे जि.प. शिक्षकांचा प्रशासनावर नाराजी आहे. तीन महिन्यांपासून राज्यभर व जिल्ह्यात सतत शिक्षक कर्तव्य म्हणून ड्युटी आतापर्यंत प्रामाणिकपणे केली आहे परंतु जि प शिक्षकांना ड्युटी देण्यात येऊ नये प्रशासन यांनी या पुढे जि.प शिक्षकांना यातून वगळून त्या ऐवजी खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षक व इतर कार्या लयातील कर्मचारी यांनाही द्यावी. अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड ,नितीन नवले , शामभाऊ राजपूत , शालीकराम खिस्ते , गुलाब चव्हाण , विष्णू भंडारे , जावेद अन्सारी , मोहमम्द गौस , रऊफ पठाण , किसन जंगले , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतिश कोळी ,चंदु लोखंडे , कडुबा साळवे ,बबन चव्हाण ,अर्जुन पिवळ ,अशोक डोळस ,के डी मगर, दिलीप ढमाळे ,प्रकाश जायभाये , निंबा साळुंके ,कैलास ढेपळे , अंकुश वाहुळ, जहांगीर देशमुख ,पंजाबराव देशमुख ,दत्ता खाडे, विलास साळुंके, सुनिल बोरसे ,पंकज सोनवणे ,पंकज सोनवणे , विलास चव्हाण,शिलाताई बहादुरे ,फातेमा बेगम, मंगला मदणे , वर्षा देशमुख ,शितल भडागे ,प्रतिभा राणे, वैशाली हिवर्डे,सुनिता चितळकर ,अर्चना गोर्डे, वंदना चव्हाण, वैशाली इंगळे ,प्रिती जाधव , जयश्री राठोड ,कल्पना नाईक , वर्षा राठोड ,संगिता मते यादी ने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close