औरंगाबाद

बाजार सावंगी येथे जनता कर्फ्यूत व्यवसाय करणाऱ्या तीन व्यापारांना प्रत्येकी दोन हजार दंड

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बाजारसावंगीत ‘जनता कर्फ्यू ‘ म्हणुन शंभर टक्के बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते. व त्यासाठी लाऊड स्पिकर द्वारा ही माहिती देण्यात आली होती. असे असतांना काही गावातील काही व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत ला कचपट समजुन व्यावसाय केला. यांना रंगेहाथ पकडण्यात आले व त्या व्यापाऱ्यांना प्रत्येकी दोनदोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याने  चर्चेला एकच उधाण आले आहे. खुलताबाद शहरासह बाजार सावंगीच्या आजुबाजुला विविध गावांत बोरवाडी, गल्लेबोरगाव , वेरूळ  ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन दोन इस्मांचा मृत्यू झाल्यामुळे बाजारसावंगी येथे भितीचे वातवरण निर्माण झाला असुण खबरदारीचा उपाय म्हणून व कोरोना संक्रमणची साखळी तोडण्यासाठी बाजार सावंगी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने गावात “जनता कर्फ्यू ” म्हणून 100% बंद पाळण्याचा ठरावण्यात आले. यात पुर्ण गाव बंद असतांना काही व्यापाऱ्यांनी व्यवसाय हावरेपोटी आपले लेन – देन सुरु ठेवले ही खबर ग्रामपंचायतला लागताच त्यांनी घटना स्थळी पोहचून त्यांना रंगेहात पकडण्यात आले. यात लक्ष्मण किरभारी गुंजाळ, शेषराव कारभारी काटकर, राजेंद्र आसाराम जाधव बाजार सावंगी आदि कृषी व्यवसायीकांना गोडाऊन वर धरून प्रत्येकी दोनदोन हजार रुपये दंड ठोठावून वसूल करण्यात आले. ही बातमी गावात पोहचताच दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामपंचायतचे आदेशाचे पालन कोणी करत नाही. परंतु आज ग्रामपंचायतीने दंड करून धडा शिकवल्याने नागरिकांनी या कारवाईचा स्वागत केले आहे. व पुढेही असीच कारवाई केल्यास नागरिक ठिकाणावर येतील असे सुज्ञ नागरिकांतून बोलला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close