औरंगाबाद

खुलताबाद शहरा पाठोपाठ आता तालुक्यातील गल्लेबोरगांव येथील एका 65वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

गावातील दोन डॉक्टरांसह घरातील अकरा जणांची स्वैब तपासणीसाठी घेण्यात आली व यांना होम क्वारंटाइन करण्यात आले

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथिल अंधार मळा येथे एका शेतात राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता. 26) स्पष्ट झाले होते.मात्र आज औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असुन गावात भीतीचा वातावरण निर्माण झाला आहे.
याबाबत माहीती अशी की,सदर महिलेला गुरुवारी (ता.25) संध्याकाळी श्वास घेण्यासाठी त्रास होत आसल्याने त्या महिलेच्या मुलाने गल्ले बोरगांव येथे दवाखान्यात आणले पण त्रास जास्त आसल्याने डॉक्टरने त्यांना औरंगाबाद येथे नेण्याचे सांगीतले त्यांनतर त्यांना औरंगाबाद येथिल शासकीय रुग्णालयात (घाटी ) उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याची तपासणी केली असता शुक्रवारी (ता. 26) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गल्ले बोरगांव त खळबळ उडाली आहे. तसेच ते कोरोना रुग्ण दोन डॉक्टर व घरातील अकरा जणांच्या संपर्कात आले आहे.यांचे सर्वांचे स्वैब तपासणी साठी घेण्यात आले. तसेच त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र (ता.27) रोजी त्या महिलेचा उपचार दरम्यान औरंगाबाद येथिल शासकीय दवाखान्यात (घाटी) येथे झाला त्या महिलेचे वय 65 होते.
खुलताबाद शहरसह आता तालुक्यातील मोठे गावांत ही कोरोनाचा शिकराव वेगाने पसरत आहे. दोन दिवसांपूर्वीच खुलताबाद शहरातील एका 62 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यु झाला होता.आता तालुक्यातील गल्लेबोरगांव येथील कोरोनामुळे एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याची हे दूसरी घटना असुन तालुका प्रशासनानी त्याची दखल घ्यावा नस्ता तालुक्यात गंभीर परिस्थिति निर्माण होऊ शकते.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गल्ले बोरगांव येथे पहिल्यांदा कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावातील सर्व दुकाने आज बंद करण्यात आली आहे गावात दवडी देऊन ग्रामस्तांनी घराबाहेर पडु नये आसे आवाहन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र लांडगे, सरपंच शोभाताई खोसरे, तलाटी कुलकर्णी, पोलीस पाटिल सिंदुताई बढे यांनी केले.

लोकांनी स्थानिक प्रशासनाला कळवावे

लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे लोकांकडे अनेक मित्रमंडळी नातलग यांची ये-जा वाढली आहे. परंतु, तरीही गावात नव्याने आलेल्या पाहुण्यांबाबत व वास्तव्याबाबत स्थानिक प्रशासनाला कळविले पाहिजे, असे आवाहन तलाटी कुलकर्णी व पोलीस पाटिल सिंदुताई बढे यांनी केले आहे. गल्ले बोरगाव येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आढल्याने येथील सर्व ग्रामस्थ व व्यापारी यांनी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने आपले दैनंदिन व्यवहार व किराणा, भाजीपालासह सर्व दुकाने दोन दिवस दि. 27 व 28 रोजी कडकडीत बंद ठेऊन जनता कर्फ्यूचे पालन करण्यात आले. त्या मुळे या काळात वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close