औरंगाबाद

जायंटस् ग्रुपकडून नाभिक समाजाच्या् सलून कारागिरांना किटचे वाटप

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

खुलताबाद येथे सोशल डिस्टन्सिंग चे अनुपालन करुन जायंटस् ग्रुपच्या वतीने खुलताबाद शहरातील नाभिक समाजातील सलून कारागिरांची,त्यांच्या रोजगाराची,अडचण लक्षात घेऊन, मोफत किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रुपचे उपाध्यक्ष सुजय खरोटे तर प्रमुख पाहूणे सद्गुरू गॅस एजन्सीचे रंविद्रसिंग होते.पाहूण्यांच्या हस्ते किट्स वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जायंटस् वेलफेअर फाउंडेशन,फेडरेशन २ ब चे समन्वयक राजेंद्र चव्हाण, युनिट डायरेक्टर दिनेश सावजी, फेडरेशन आँफिसर सुनील मरकड, जायंटस् चे माजी अध्यक्ष नवनाथ बारगळ, सचिव सतीश कोळी,कोषाध्यक्ष राजाभाऊ वायाळ, संचालक अनिल भालेराव,आंदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नाभिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी घोडके सह सलून कारागीर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमचे संचालन वायाळ सर तर आभार सचिव सतीश कोळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close