औरंगाबाद

सर्वसामान्य शिक्षक गेला गोंधळून जिल्हा परिषद औरंगाबाद शिक्षण विभागाचे शाळा चालू ठेवणे अथवा बंद ठेवणे यासंबंधी कोणतेच स्पष्ट आदेश नाही दररोज नवीन पत्र

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा फैलाव प्रचंड गतीने वाढत आहे हे काही लपून राहिलेले नाही सध्या कोरून या विषाणूने ग्रामीण भागात सुद्धा डोके वर काढले असून अनेक गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे हेही सत्य आहे ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याची चिंता सतावत आहे यातही शंका नाही पण 15 जूनला महाराष्ट्र शासनाने एक संदिग्ध आदेश काढून शाळा चालू करायच्या की बंद ठेवायच्या यासंबंधी कोणत्याही स्पष्ट सूचना अथवा आदेश दिला नाही त्यांनी जिल्हा परिषदेवर हा निर्णय सोपवला हे पत्र आल्यानंतर 20 जून 2020 ला शिक्षणाधिकारी प्राथमिक औरंगाबाद यांनी पुन्हा एक संदिग्ध आदेश काढून शिक्षकांनी शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित न ठेवता फक्त शिक्षकांनी उपस्थित राहावं असे सांगितले पुढे 24 जून 2020 ला पुन्हा एकदा शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे सही न केलेले पत्र व्हाट्सअप ग्रुप वर फिरायला लागले त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम करणारा गुरुजी प्रचंड गोंधळून गेला व धास्तावला सुद्धा कारण 22 जूनला शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे लेखी आदेश निघाल्यानंतर औरंगाबाद तालुक्यातील काही शिक्षण विस्तार अधिकारी तालुक्‍यात शाळांना भेटी द्यायला सुरुवात केली त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कोणताही एक स्पष्ट आदेश द्यावा तोही लेखी स्वरुपात शिक्षकांनी शाळेमध्ये उपस्थित राहून शैक्षणिक वातावरण निर्मिती करायची की शिक्षकांनी शाळेमध्ये उपस्थित राहायचे नाही असा कोणता तरी एक निर्णय घ्यावा कारण औरंगाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यात शिक्षक शाळेत जातात तर काही तालुक्यात शिक्षक शाळेत जात नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे ही सर्व संदिग्धता बघून औरंगाबाद जिल्ह्यातील शाळेसंबंधी स्पष्ट आदेश लेखी स्वरूपात शिक्षण विभागाने काढावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
“औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शाळा चालू करण्यासंबंधी अथवा बंद ठेवण्या बाबतीत शिक्षण विभागाने आतापर्यंत वेगवेगळी पत्र काढले असून त्यातही 24 जून ला काढलेले पत्र चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे सही न केलेले आहे त्यामुळे ग्रामीण भागात ज्ञानदानाचे पवित्र काम करणारा शिक्षक धास्तावला असून जिल्ह्यातील शाळेत एकसूत्रता येण्यासाठी कोणताही एक आदेश शिक्षण विभागाने लेखी स्वरुपात दिला पाहिजे”
विजय साळकर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती औरंगाबाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close