औरंगाबाद

पत्रकाराविरूद्ध खोटी तक्रार करणाऱ्या अभियंत्यावर कडक कारवाई करा ,पत्रकार सेवा संघाची मागणी

खुलताबाद येथील पत्रकारांवर तालुक्यात खोटे गुन्हा दाखल करायचा सपाटा चालु

Spread the love

खुलताबाद / सलमान खान

खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगी परिसरात पाच ते सहा तास वीज गुल झाली असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिध्द केल्याचा राग आल्याने बाजार सांवगी येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने पोलीसात खोटी तक्रार केली आहे. संबंधीत महावितरण सहय्यक अभियंत्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी व अभियंत्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत एकोंतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात यावे अशी या मागणीसाठी आज पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने खुलताबाद पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे , प्रश्न मांडणे हे पत्रकारांचे मूळभुत कर्तव्यच आहे. खुलताबाद तालुक्यातील बाजारसांवगी येथे गेल्या अनेक दिवसांपासून वीजेचा लंपडाव सातत्याने सुरू होता.पवित्र रमजान महिना चालू असुन सुद्धा विज कंपनीचा मनमानी कारभार सुरुच होता.वेळोवेळी रमजान महिन्यात विज पुरवठा खंडित होत होता आणि अगोदर ही होत होता.याबाबत महावितरण कंपनीकडून दरवेळी वेगवेगळी कारणे दिली जातात. तक्रारीची दखल घेतली जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसात वीज गुल होत असल्याने नागरिकांनी लेखी तक्रार ही केली आहे. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रात बातम्याही प्रसिध्द झाल्या . या बातम्यामुळे महावितरणची बदनामी झाल्याचे नमूद करीत बाजारसांवगीचे अभियंता प्रदीप काळे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नागरिकांच्या अडीअडचणी तक्रारी वृत्तपत्रात येवूच नये यासाठी पत्रकाराविरूध्द खोट्या तक्रारी पोलीसात देवून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न महावितरणच अभियंते करत आहे. पत्रकार अशाखोट्या तक्रारीला घाबरणार नाही. महावितरणचे अभियंता प्रदीप माणिकराव काळे यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी खुलताबाद पत्रकार सेवासंघाच्या वतीने खुलताबाद पोलिस स्टेशनला दिले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसता शिरसाट गल्लेबोरगावकर, मूक्तार सय्यद, अण्णा जाधव, गणेश मूराडे, संतोष करपे, बशीर शेख, मछिंद्र घोरपडे, सलमान खान, ईसाक कूरेशी, भिकन शाह,आजिनाथ बारगळ,नईम शाह, अमिन भाई, आदी पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close