औरंगाबाद

अवैध देशी,विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी गंगापुर पोलींसाची कार्यवाही

Spread the love

लगंगापूर/प्रतिनिधी

गंगापूर पोलिसांना नेवरगाव मार्गे मोटरसायकलवर अवैध दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ आहे, अशी खबर्‍या मार्फत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातून नेवरगाव मार्गे मोटरसायकलवर येणाऱ्या सर्व वाहनांची पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ मुरकुटे, बलवीर सिंग बहुरे,आणि गुडे हे प्रत्येक गाडीची कसून तपासणी करत होते त्यात त्यांना एक स्टार सिटी कंपनीची मोटरसायकलवर रमेश बोडके रा. बगडी हा देशी विदेशी दारू घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 48 देशी दारूच्या व 36 विदेशी दारूच्या अशा एकूण 18 हजार रुपये किमतीचा माल व एक टीव्हीएस स्टार कंपनीची मोटरसायकल किंमत 30000 रुपये असा एकूण 48000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरी कार्यवाही गंगापूर लासुर रस्त्यावर मालुंजा जवळ स्कुटी मोटरसायकलवर विदेशी दारू घेऊन लासुर स्टेशन कडे जात असताना शामसुंदर बीहारीलाल शर्मा रा.लासुर स्टेशंन ता. गंगापूर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विदेशी दारूच्या एकूण ९१ बाटल्या किंमत ७७५० रुपये किमतीचा मुद्देमाल व एक स्कुटी मोटरसायकल किंमत १५०० रुपये असा एकूण २२७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरिक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस वी वाघमारे गणेश काथार आणि होमगार्ड पाटील यांनी केली सदरील दोन्ही प्रकरणांमध्ये गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close