औरंगाबाद

खुलताबाद येथे पत्रकारावर झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गंगापूर येथे तहसीलदारांना निवेदन

Spread the love

गंगापूर/प्रतिनिधी

खुलताबाद येथील पत्रकारावर बातमीच्या अनुषंगाने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव चालू आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीला अनेकदा गावकऱ्यांनी निवेदनही दिले आहेत. या निवेदनाचा संदर्भ घेत, बाजार सावंगी येथील पत्रकारांनी वीज वितरण संदर्भात वेगवेगळ्या दैनिकात यासंदर्भात बातम्या छापल्या. त्याचा राग मनात धरून महावितरणची मानहानी व बदनामी झाली असे नमूद करून बाजार सावंगी येथील महावितरणचे अभियंता प्रदीप माणिकराव काळे यांनी खुलताबाद पोलीस स्टेशन येथे संबंधित वार्ताहर विरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार झाला असून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अभियंता विरुद्ध शासन स्तरावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीचे निवेदन गंगापुर तालुका मराठी पत्रकार संघाचे रमाकांत बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली ना.तहसीलदार बि डी तेजीनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयुब पटेल, विजय बनसोड अलीम चाऊस. हरुण पठाण. अन्वर बागवान, महंम्मद तांबोळी, शिवप्रसाद बन्सोड,ईब्राहीम शेख, अतुल रासकर,अरूण वाकडे, अमीन पटेल, खलील पटेल, सुभान शहा, रशीद शहा आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close