औरंगाबाद

गंगापूर तालुक्यात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांची टोळी स्तानीक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Spread the love

गंगापूर /प्रतिनिधी

गंगापूर तालुक्यात सर्वत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतांना दिनांक 20/05/2020 रोजी विलास संपत सुरासे वय 49 वर्ष, व्यवसाय शेती रा भालगाव ता गंगापूर जि ओरंगाबाद यांनी पोलीस ठाणें शिल्लेगाव येथे फिर्याद दाखल केली होती की, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण प 60,500 रुपयाचं ऐवज चोरून नेला ,सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व भेट देऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्तानीक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरून गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे माहिती मिळाली की सदर चा गुन्हा हा संदीप समाधान चव्हाण रा नवाबपूरवाडी ता गंगापूर जि ओरंगाबाद यानें त्याचं साथीदारासह केलेला आहे त्यांवरून संदीप समाधान चव्हाण वय 18 वर्ष रा नवाबपुरवाडी यास विचार पूस केली असता त्याने त्याचे साथीदार सुरेश हरदास भोसले वय वर्ष 27 रा नावबापुरवाडी ह मु मुदेशवडगाव यांच्या सह केल्याची कबुली दिली .सदर टोळीकडून आणखी बरेच घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदर ची कामगिरी मा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्तानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस उप निरीक्षक भगतसिंग दूलत यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close