औरंगाबाद

हाताचा स्पर्श न करता हात धुवा, करोना टाळा,आमदार बंब यांनी फुट सॅनिटायझर ऑपरेटिंग मशीन दिले उपजिल्हा रुग्णालयास भेट

Spread the love

गंगापुर /प्रतिनिधी

आमदार प्रशांत बंब यांनी दि २६ मे रोजी दिलेल्या गंगापुर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाठी फुट सॅनिटायझर ऑपरेटिंगमशीनचे उद्घाटन नगरसेवक प्रदिप भैय्या पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझर किंवा नळाच्या पाण्यानं हात स्वच्छ करतो. पण त्यासाठी हँडवॉश, सॅनिटायझरची बाटली आणि नळाला हात लावतो. त्यामुळं संसर्ग होण्याची भीती असते. त्यावर गंगापुर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला आमदार प्रशांत बंब यांनी फुट ऑपरेटिव्ह हॅंडवॉश आणि सॅनिटायझर मशीन भेट दिली आहे या मध्ये हॅण्डवॉश, नळाला हात लावण्याची गरजच नाही. हात स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि दवाखान्यात येणारे रुग्ण या यंत्रणेचा वापर करत आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिक हँडवॉश, नळ सोडण्यासाठी हाताचा वापर करतात. सॅनिटायझर घेण्यासाठी बाटलीला हात लावावा लागतो. त्यातून करोनाग्रस्त व्यक्तीने हात लावला असल्यास करोनाचा संसर्ग होण्याची भीती असते.म्हणून वैद्यकीय कर्मचारी किंवा रुग्ण हा आरोग्य केंद्रात आल्यानंतर तो प्रथम पायाने पॅडल दाबून हँडवॉश लिक्विड हातात घेतो. त्यानंतर हात धुण्यासाठी पायाने पॅडल दाबल्यानंतर नळ सुरू होऊन पाण्याने हात धुतो. त्यानंतर आरोग्य केंद्रात प्रवेश केल्यावर या यंत्रणेच्या साह्यानं सॅनिटायझरही घेतले जात आहे.आमदार बंब यांनी दिलेल्या फुट सॅनिटायझरऑपरेटिंग मशीनचे प्रशासकीय अधिकारी, नागरिक कौतुक करत आहेत यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ बुशरा खान ,नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास,नगरसेवक भाग्येश गंगवाल ,विशाखा समितीचे प्रशांत मुळे ,डॉ गितेश चावडा आदि उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close