औरंगाबाद

कोरोना संबंधीत कामासाठी फक्त जि.प.शिक्षकांच्या नियुक्त्या, नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याची शिक्षक समितीची मागणी

खुलताबाद तालुक्यात महिला शिक्षिकांना रेशन दुकानांवर अन्यायकारक नियुक्त्या

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे , यासाठी शिक्षकांना स्वस्त धान्य दुकान,चेक पोस्ट,रेड झोन मधील रुग्ण असलेल्या जो एरिया सिल केला आहे त्या ठिकाणच्या नियुक्त्या,सर्वेक्षण या प्रकारे अनेक कामासाठी फक्त प्रशासन जि.प.च्या शिक्षकांनाच जाणीवपुर्वक नियुक्त्या देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शहरातील कंटेन्टमेट झोनमधील चेक पोस्ट करीता नियुक्ती देत असल्यामुळे जि.प.शिक्षकांचा जिल्हा प्रशासनावर नाराजीचा सुर वाढू लागला आहे . खुलताबाद तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांवर तालुक्यात अनेक षुरुष कर्मचाऱी उपलब्ध असतांनाही महिला शिक्षिकांना जाणिवपूर्वक कामे देण्यात आल्याचा आरोप शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले, कुठल्याही प्रकारची कामे देतांना स्थानिक पं.स.कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून नावे घेतली पाहिजे होती..परंतु तहसील कार्यालयाने जाणिवपुर्वक काही महिलांनाच लक्ष करुन गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नावे न मागवता परस्पर आपल्या मर्जीतील पुरुष शिक्षकांना वगळून काही महिलां शिक्षिकांना रेशनिंग दुकानंवर पाठविल्याने महिला कर्मचाऱ्यांत रोष व्यक्त होत आहे. महिला कर्मचाऱ्यांना यातून वगळावे व ज्या रेशन दुकानात ज्या वाडी,वस्ती वरील रेशन कार्डधारक आहेत त्या गावातील वाडी वस्ती वरील स्थानिक शाळेतील पुरुष शिक्षकांना हेतुपूर्वक टाळून..त्या शाळेतील, गावातील,वाडी,वस्ती वरील शिक्षकांना न घेता दुसऱ्या शाळेतील महिलांनाच का?अशी शंका उपस्थित केली आहे. सलग १८ ते २०दिवस झाले तरीही बदली कर्मचारी वर्ग केला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात महिला शिक्षकांना ड्युट्या लावल्या नसताना खुलताबामध्ये ऐवढा अठ्ठाहास का? अशी मागणी करुन ही अन्यायकारक बाब शिक्षक समिती ई-मेल द्वारे मुख्यमंत्री,शिक्षण मंत्री,ग्रामविकास मंत्री व आरोग्य मंत्री यांना केलेल्या निवेदनात केली असल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, नितीन नवले, शामभाऊ राजपूत, शालीकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारे, रऊफ पठाण,
किसन जंगले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतिश कोळी,चंदु लोखंडे, कडुबा साळवे, अर्जुन पिवळ, बबन थोरे,अशोक डोळस, के.डी.मगर, दिलीप ढमाळे, प्रकाश जायभाये, निंबा साळुंके, कैलास ढेपळे, अंकुश वाहुळ, जहांगीर देशमुख,पंजाबराव देशमुख, दत्ता खाडे, विलास साळुंके, सुनिल बोरसे, पंकज सोनवणे, विलास चव्हाण व शिक्षक समिती महिला आघाडी आदींनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close