औरंगाबाद

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लुडो, कॅरम,पब्जीत तरुणाई लॉकडाऊन

लहान बालकांना याचा लळा मैदानी खेळापेक्षा अधिक लागल्याने ही धोक्याची मोठी घंटी ठरू शकते

Spread the love

खुलताबाद / सलमान खान

मोबाईल मुळे जग जवळ आलं हे खरे असले तरी यामुळे खुलताबादेत सध्या युवकांना याचा अतिवापर दिशाहीन करत असल्याचे पाहायला मिळते सध्या प्रत्येकाकडेच अँड्रॉइड मोबाइल आणि त्यातून मिळणारा 4G चा वेग दोन जीबी डाटा यामुळे युवक पूर्णवेळ यामध्ये गुंतला आहे . याबरोबरच पब्जी , लुडो कॅरम खेळ सोबतीला कोणी असू नसो ऑनलाईन पद्धतीने खेळवले जात असल्याने तरुणांची ऊर्जा यामध्येच खर्च होताना दिसत आहे. लहान बालकांना याचा लळा मैदानी खेळा पेक्षा अधिक लागल्याने ही धोक्याची मोठी घंटा ठरू शकते . सध्याचा लॉकडाऊन पूर्णपणे तरुणाईला मोबाईलमध्ये गुंतून ठेवणारा ठरला आहे.काळाच्या ओघात अनेक गोष्टी सोपस्कार आणि फायद्याच्या निर्माण झाल्या असल्या तरी यामध्ये नुकसानही तेवढेच दडल्याचे सध्या सुरू असलेल्या मोबाईलचा वापराने दिसून येते जगातील कुठलीही गोष्ट लवकर आणि सहजतेने सर्वांच्या हातात आली. जग जवळ आले असले तरी अड्रॉइड मोबाईलच्या अतिवापराने तरुणांची ऊर्जा नको तिथेच जास्त प्रमाणात खर्च होताना पाहायला मिळते . 4G यातून मिळणारा डाटा तरुणांना दिशाहीन करण्याचे काम करणारा ठरतो आहे फेसबुक , व्हाट्सअप संवादाचे साधन बनले . गुगलने जगाला जवळ आणले याचा उपयोग चांगल्या कामासाठी करणारे युवक कमी असल्याचे आढळून येते. यापेक्षा त्याचा वापर इतर गोष्टींसाठी अधिक प्रमाणात होत असल्याने तरुणांना या साधनांने जेरबंद करित यामध्ये गुरफटून ठेवले. पब्जी, कॅरम लूडो हे खेळ तरुणांना वेळेचे महत्त्व ही कळू देत नाहीत. खुलताबादेत अनेक ठिकाणी या खेळांचे डाव सुरु झाले तर कधी संपतील याचा नेम नसतो.विशेष म्हणजे खेळायला जर कोणी सोबत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने ते खेळवले जात असल्याने पूर्णवेळ युवक याच्या आहरी गेल्याचे धक्कादायक वास्तव अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तरुण सोबतच लहान बालके ही घरीबसून असल्यामुळे या खेळात डुबवल्याने मैदानापेक्षा मोबाईल स्क्रीनवरच अडकल्याने बालकांत गंभीर मानसिक व शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते. कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला असुन मोबाईलच्या वापर वाढला आहे. मोबाईलचा अतीवापरामुळे मानेचा त्रास, डोके दुखी, डोळे यांना गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून येत असले तरी अजुनही अजहरी गेलेल्या तरुणांना ना स्वतःचे भविष्याचा वेध आहे ना आरोग्याची चिंता असेच दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close