औरंगाबाद

वाळूज बजाजनगर परिसरातील आरोग्यसेविका कोरोना पॉझिटिव्ह,बाधीताच्या संपर्कात आले सात जण

Spread the love

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

वाळूज ओद्योगिक शेत्रात असलेल्या बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत राहणारी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात नर्स म्हणून काम करणारी एक २९ वर्षीय महिला बुधवार ६ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. हि महिला तीच्या पती सोबत येथील इंद्रप्रस्थ काॅलनीत किरायाने राहते तीच्या संपर्कात आलेल्या सात जणांना तपासणी साठी घेऊन गेले आहेत तसेच काॅलनीतील पाचशे घर सील करण्यात आली असुन सदरील महिलच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी घेत आहेत. या विषयी अधिक माहिती अशी की,बजाजनगर परिसरातील एका २९ वर्षीय महिला ही औरंगाबाद येथील सिडको परिसरातील मनपाच्या रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्स म्हणून काम करते. काही दिवसापुर्वी या नर्सची प्रकृती खराब झाल्यामुळे तिने रजा घेतली होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे २० एप्रिला पासून ती पुन्हा कामावर हजर झाली होती. एक आठवडा काम केल्यानंतर या तिची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे तिने २८ एप्रिलपासून रुग्णालयात जाणे बंद केले होते. तसेच तिला कोरोनाचे लक्षणे दिसत असल्याने एमजीएम रुग्णालयात तिची आरोग्य तपासणी केली असता बुधवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा रिपोर्ट पाॅझीटिव्ह आल्याची माहिती मिळाल्यावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सपोनि विजय घेरडे, पोउपनि प्रिती फड आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व काॅलनी सील केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी दत्तात्र्य घोलप, साथरोग अधिकारी डॉ.बारडकर, डॉ.कुडीलकर, डॉ. लहाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, डॉ. संग्राम बामणे आदींच्या पथकाने तिच्या घरी भेट दिली. सकाळी कोरोना बाधित नर्सची चौकशी केल्यानंतर तिला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र रुग्णवाहिक तब्बल चार तास उशिरा दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास आली. त्यानंतर कोरोना बाधित नर्सला उपचारासाठी दाखल केले तसेच तिच्या संपर्कात आलेल्या तिचा पती, तीन नातेवाईक, तीन जण शेजारी राहणारे व तिच्या सोबत काम करणाºया एका फार्मासिस्ट यांची तपासणी करुन त्यांचे स्वॅबचे नमुने घेतले जाणार आहे. यातील सात जणांना दुपारीच तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांनी दिली. यावेळी तहसीलदार किशोर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत, पं.स.सदस्य राजेश साळे, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई आदींनी भेट देऊन पाहणी केली. वाळूजमहानगर परिसरात दुसरा कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे त्यामुळे अनेक काॅलनीत सु या पुर्वी वडगाव कोल्हाटी येथे मुंबई हून आलेला एक जण पाॅझीटिव्ह निघाला होता मात्र तो इतरांच्या संपर्कात येण्या आगोदर त्याची तपासणी झाल्याने पुढील अनर्थ टळला होता. त्याला रूग्णालयात दाखल करताना पत्नी, चार पोलीस कर्मचारी व अँब्यूलन्स वरील डाॅक्टर व चालक यांची तपासणी केली असता सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close