औरंगाबाद

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला दरोडा,दरोड्यात वापरले जाणारे साहित्य जप्त,कायगाव शिवारातील घटना

Spread the love

गंगापूर/प्रतिनिधी

पोलीस स्टेशन गंगापूर अंतर्गत दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक चाटे पेट्रोलिंग करत असताना त्यंना अशी माहिती मिळाली की औरंगाबाद ते नगर रोड ने एक मॅक्स महिंद्रा जीप भरधाव वेगाने जात असून कायगाव परिसरात संशयित रित्या फिरत आहे व त्यामध्ये चोरटे असण्याची शक्यता आहे, त्यावरून पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, सहाय्यक फौजदार मगरे, चालक शेख, चालक चंदनसे, तसेच नवीन कायगाव येथील ग्राम संरक्षण दलाचे सदस्य यांना घेऊन तात्काळ गाडीचा पाठलाग केला असता, सदरची गाडी ही पखोरा शिवारात कच्च्या रस्त्याने भरधाव वेगाने निघून गेली पोलिसांनी पाठलाग करून गाडी पकडली असता असता गाडीतील चोरटे अंधारात फायदा घेऊन पसार झाले. सदर गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये घरफोडी दरोड्याचे चे साहित्य,  टॉमी, पकड चिमटा, आणि एक दारूचा बॉक्स, तसेच स्वतःचा चेहरा लपवून ठेवण्यासाठी काळ्या रंगाचे प्लास्टिकचे मास इत्यादी साहित्य मिळून आले आहे. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे चालू आहे. अधिक तपासादरम्यान सदरचे वाहन जीप ही रहता अहमदनगर येथून पंधरा दिवसापूर्वी चोरीला गेलेली असल्याचे समजले असून दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन हद्दी मध्ये दारूच्या दुकानाची घरफोडी चोरी झालेली आहे त्या गुन्ह्यात हीच गाडी वापरल्याचे समोर आलेले आहे, पुढील तपास चालू आहे सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे पोलीस उपनिरीक्षक चाटे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close