औरंगाबाद

गंगापूर येथे गावठी कट्टा विक्री करणाऱ्या टोळीतील एकास पकडले रंगेहाथ

Spread the love

गंगापूर/महंमद तंबोली
गंगापूर शिवारात तीन जणा कडुन चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल पाच हजार रुपये किमतीचे जीवंत काडतुसे, चाळीस हजार रुपये किंमत असलेली स्प्लेंडर कंपनीची क्रमांक एम एच 20 ई. एम. 9720 मोटरसायकल सायकल असा एकूण 85 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आले असून दोन आरोपी फरार झाले ही कारवाई विशेष पोलिस पथकाने केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. सागर कदम, कुष्णा डोळस, दोघे राहणार गंगापूर आदीनाथ जाधव, राहणार जामगाव हे तिघे शहरातील जुनी भाजी मंडई तीनकोणी चौकात कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप निरीक्षक विवेक जाधव, यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती. दि 10 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास सागर कदम, कुष्णा डोळस, आदीनाथ जाधव हे त्यांच्याकडे असलेला गावठी पिस्टल विनापरवानगी विक्री करण्यासाठी गंगापुर येथील जुन्या भाजी मंडी परिसरात येणार असल्याचे माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाच्या पोलिसांनी तिथे छापा टाकून एकाला अटक केली तर दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले, आरोपींच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे एक मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस उप निरीक्षक विवेक जाधव, पोहेका योगेश खाबाटं, अभिजित डहाळे यांनी केली. या प्रकरणी भारतीय शस्त्र कायद्याप्रमाणे विनापरवानगी शस्त्र बाळगल्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र जवळ असल्याने याचे, लोण आता गंगापूर तालुक्यात देखील पसरले असल्याने बनावट पिस्तूल विक्री करणाऱ्यांनी आता डोके वर काढले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले, असून या बनावट पिस्तूल विक्री करणाऱ्या मध्ये किती जणांचा समावेश आहे याचा पोलीस शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close